
दै.स्थैर्य, कराड, दि. 13 (प्रमोद गरगटे) : आता कराडची बाजारपेठ फुलू लागली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरु झाला आणि माणसांच गतीचक्र थांबल.
लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यानंतर शिथिलतेमुळे जनजीवन हळूहळू सुरु होण्याच्या मार्गावर आहे. व्यवसायिकांनी शासनाचे सर्व नियम जास्तीतजास्त पाळत व्यवसायांना सुरवात केली.
कराडची बाजारपेठ ही आजूबाजूच्या गावांवर बरीचशी अवलंबून आहे परंतू तालूक्यातून कराडमध्ये नियमित येणारी एस टी , रिक्षा , वडाप असा पर्याय खुला झाला नाही त्यामुळे बाजारपेठेमधे अजूनही हालचाल झालेली दिसत नाही.
आता पावसाळा सुरु होतोय त्याची तयारी म्हणून पावसाळी रेनकोट,छत्री असे सेल रस्तोरस्ती दिसू लागले आहेत. आता शाळा कधी सुरु होणार हे अनिश्चित असल्यामुळे रेनकोट खरेदिसाठी होणारी बालगोपालांची गर्दी बाजारात दिसून येत नसल्याने व्यवसायिकांना त्याची चिंता पडलेली दिसते.
अनेक तर्हेच्या रंगीबेरंगी छत्र्या व रेनकोट बाळगोपाळांची वाट पहात असल्याचे दिसत आहे. इथून पुढे येणारे सर्व सणवार कसे होतील व व्यवसाय कसा होईल हे जरी माहीत नसले तरी प्रत्येकजण आपण कोरोनापासून सुरक्षित कसे रहायचे व जीवन सुखकर व्हावे अशी प्रार्थना मनोमनी करीत असावा असे वाटते.