कराड – पाटण – चिपळूण मार्ग दोन महिने वाहतुकीसाठी बंद

पाटण येथे पुलाचे कामामुळे वाहतूक मार्गात बदल


स्थैर्य, 27 मार्च, सातारा : पाटण पोलीस ठाणे हद्दीतून जाणारा कराड ते चिपळूण राष्ट्रीय महामार्ग क्र. 166 ई या महामार्गावर पाटण शहरातील धांडे पुलाची पुर्नबांधणी आणि बाजारपेठेतील क्रॉक्रीट रस्त्याचे काम करणेचे असलेने सदर मार्ग सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णतः बंद करुन पुलाची पुर्नबांधणी आणि बाजारपेठेतील क्रॉक्रीट रस्त्याचे काम पुर्ण करणेकरीता 60 दिवस कालावधी लागणार असलेने तोपर्यत नागरीकांची तसेच वाहनचालकांची गैरसोय होवू नये याकरीता सदर मार्गावरील वाहतूकीचे नियोजन करणे आवश्यक आहे. त्या करीता पर्यायी मार्गाची उपलब्धता असलेने सदर मार्गावरील वाहतुक वळविणे आवश्यक आहे. त्याबाबतची अधिसुचना प्रसिद्ध करणेत येत आहे.

तुषार दोशी भापोसे, पोलीस अधीक्षक सातारा, यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 34 अन्वये प्राप्त असलेल्या अधिकारान्वये पाटण शहरातून जाणारा कराड ते चिपळूण राष्ट्रीय महामार्ग क्र. 166 ई वरील वाहतूक मार्गात बदल करुन वाहतूक व्यवस्था सुरळीत राहणेकरीता दि. 27 मार्च 2026 चे 00.01 ते 27 मे 2026 चे 23.59 वा. पर्यत खालील अधिसुचना पारित करीत केली आहे.

वाहतुक मार्गातील बदलाबाबत
  • वाहतूक मार्गातील बदल खालीलप्रमाणे करण्यात आला आहे.
    कराड व उंब्रज बाजुकडुन चिपळूणकडे जाणारी अवजड वाहतुक :-
    कराड व उंब्रज येथून सरळ राष्ट्रीय महामार्ग क्र. 04 वरुन पाचवंड फाटा उंडाळे कोकरुड मलकापूर आंबा घाट संगमेश्वर वरुन चिपळूणकडे जाईल.
  •  चिपळूणकडून कराड व उंब्रजकडे येणारी अवजड वाहतुक :
    चिपळूणवरुन संगमेश्वर आंबा घाट मलकापूर, कोकरुड, उंडाळे, पाचवड फाटा राष्ट्रीय महामार्ग क्र. 04 वरुन कराड, उंब्रज कडे जाईल.
  •  कराड व उंब्रज बाजुकडुन चिपळूणकडे जाणारी सर्व हलकी वाहतुक :
    कराड व उंब्रज येथुन नवारस्ता गव्हाणवाडी फाटा नेरळे गौंड येथुन कराड ते चिपळूण महार्गावरुन चिपळूणकडे जातील.
  •  चिपळूणबाजूकडून कराड उंब्रजकडे येणारी सर्व हलकी वाहतूक :
    चिपळूणकडून येणारी वाहतुक नेरळे गौंड, गव्हाणवाडी फाटा, नंवारस्ता मार्गे कराड व उंब्रजकडे जातील.
    तरी ही वाहतूक ज्या ज्या ठिकाणावरुन वळविण्यात आली आहे. त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे. वाहतूक मार्गात केलेल्या बदलांबाबत सर्व नागरीकांनी व वाहन चालकांनी नोंद घेवून पोलीस दलास सहकार्य करावे असे आवाहन पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!