
स्थैर्य, कराड, दि. २२ (प्रमोद गरगटे) : कोरोनाच्या महामारीमुळे देश विदेशातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे त्या मुळे सगळीकडे जैसे थे परिस्थिती निर्माण झाली होती आता लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरु झाला असून कोरोनाची स्थिती मात्र अजून गंभीर आहे .परंतू नूसते घरी बसून सामान्य जगू शकत नाहीत. घरामधे थोडेफार साठवलेले पैसेही संपून गेले आणि उपासमारीची वेळ आली. तसेच अर्थव्यवस्थेस चालना मिळावी व जनजीवन थोडेतरी सुरळीत व्हेवे या उद्देशाने कोरोनाचा प्रादूर्भाव लक्षात घेवून योग्य ती उपाययोजना व सुरक्षित नियम व अटी शर्थी घालून महाराष्ट्र शासनाने व त्यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांनी आजपासून सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळात आपआपली दूकाने व्यवसायासाठी खुली करण्याचे आदेश दिले आहेत.
कराड तालूका हॉटस्पॉट म्हणून ओळखला जात आहे त्यामुळे कराडकर पहिल्यापासूनच स्वतःहाची काळजी घेत सोशल डिस्टंसींग पाळून आणी शासनाच्या आदेशाचे पालन करुन खबरदारी घेत आहेत.
आजही व्यवसायिक दृष्या बाजारपेठ खुली झाली असली तरी कोणतीही गडबड व सोशल डिस्टंसीग पाळत आपले व्यवहार करताना दिसत आहे ..कोरोना स्वाभिमानी आहे तो स्वतःहा तूमच्याकडे येत नाही तुम्ही बाहेर पडून त्याला घेवून येवू नका ..आवश्यक असेल तरच बाहेर पडा सुरक्षित रहा.
आज बाजारपेठ काही प्रमाणात सुरु झालेली दिसते व पोलीस प्रशासन योग्य ती खबरदारी घेण्यास नागरिकांना सूचना देत आहे.