
फलटणमधील ज्येष्ठ व्यापारी कांतीलाल गौतमचंद कोठारी (बुधकर) यांचे अल्पशा आजाराने निधन. व्यापारी व जैन समाजात शोककळा.
स्थैर्य, फलटण, दि. ०८ मार्च : फलटण शहरातील जुन्या पिढीतील ज्येष्ठ व्यापारी कांतीलाल गौतमचंद कोठारी (बुधकर) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने फलटणमधील व्यापारी व जैन समाजात हळहळ व्यक्त होत आहे.
स्व. कांतीलाल कोठारी हे शांत, संयमी आणि समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या कार्यामुळे व्यापारी व सामाजिक क्षेत्रात त्यांचा मानाचा ठसा उमटला होता.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुले, तीन विवाहित मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचे सुपुत्र राजेंद्र कोठारी आणि प्रीतम कोठारी हेही शहरातील व्यापारी क्षेत्रात कार्यरत आहेत.
स्व. कोठारी यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा उमाजी नाईक चौक येथील त्यांच्या राहत्या घरापासून दुपारी साडेचार वाजता निघाली. त्यानंतर वैकुंठ स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या निधनाने कोठारी परिवारासह फलटणच्या व्यापारी व जैन समाजात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
