स्थैर्य, नवी दिल्ली, दि.११: बिहार
विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यापासून सर्वच राजकीय पक्ष जोरदार
तयारीला लागले आहेत. काँग्रेसकडून आपल्या स्टार प्रचारकांची यादी निवडणूक
आयोगाला सोपवण्यातआली आहे. तर भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या स्टार
प्रचारकांमध्ये कन्हैया कुमार, जेएनयूचे विद्यमान अध्यक्षा आयेशा घोष, माजी
अध्यक्ष आशुतोष कुमार यांच्यासह ३० जणांचा समावेश आहे.
कन्हैया कुमार हे राष्ट्रीय स्तरावरील
नेता आहेत. त्यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकांत बेगुसरायमधून निवडणूक
लढवली होती. मात्र, त्यांचा पराभव झाला होता. आता बिहार विधानसभा
निवडणुकीमध्ये कन्हैया कुमार भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा प्रचार करतील.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाने काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाशी महागठबंधन
केले आहे. राष्ट्रीय जनता दल 144, काँग्रेस 70 आणि डावे पक्ष 29 जागांवर
लढणार आहेत.