कंगना रणावत यांचा महाबळेश्‍वरमध्ये निषेध


 

स्थैर्य, पांचगणी, दि. ०७ : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणावत हिने मुंबईची तुलना थेट पाकव्याप्त काश्मीरशी करून व मुंबई पोलिसांविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याने येथील महिला आघाडीच्या वतीने जोरदार आंदोलन करून जाहीर निषेध करण्यात आला.

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रणावत हिने सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणावरून मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली. तसेच सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणावरून मुंबई पोलिसांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. रणावत हिने केलेल्या या कथित वक्तव्यांचा सर्व स्तरातून निषेध केला जात आहे. त्याचे पडसाद आज महाबळेश्‍वरमध्ये देखील उमटले. येथील शिवसेनेच्या महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख श्रीमती राजश्री भिसे व वनिता जाधव यांच्या नेतृत्वाखाली व शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र गुजर यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील सुभाष चौकात शिवसेनेच्या रणरागिणी मोठ्या संख्येने एकत्र आल्या. गळ्यात शिवसेनेचा मफलर व हातात भगवा झेंडा घेऊन या रणरागिणींनी कंगना विरोधात मोठ्याने निषेधाच्या घोषणा दिल्या. यावेळी कंगनाच्या छायाचित्रावर महिलांनी निषेधाच्या घोषणा देत चप्पल भिरकावल्या.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!