दैनिक स्थैर्य । दि. १९ जून २०२२ । फलटण । मार्च २०२२ मध्ये झालेल्या इ.10 वी च्या बोर्ड परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यात कमला निंबकर बालभवन शाळेने आपली इयत्ता १० वीच्या बोर्ड परीक्षेत १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखत उज्ज्वल यश संपादन केले. विशेष म्हणजे या शाळेचे सर्व विद्यार्थी, 71% च्या वर गुण मिळवून यशस्वी झाले आहे. यावर्षी २९ पैकी २६ विद्यार्थी Distinction {75% च्या वर गुण मिळवणारे) त्यातील 23 विद्यार्थी 80% च्या वर गुण मिळवणारे आहेत.
तर त्यातील 11 विद्यार्थी 90% च्या वर गुण मिळवणारे आहेत. प्रथम आलेल्या दोन विद्यार्थीनीना 97.40% गुण प्राप्त झाले आहेत.तर एकीला शासनाचा छत्रपती शाहू महाराज पुरस्कार,5000/ मिळणार आहे.त्यांच्या या यशाबद्दल संस्थेच्या सचिव डॉ.मंजिरी निंबकर, अध्यक्ष झिया कुरेशी,विश्वस्त डॉ.चंदा निंबकर,सर्व विश्वस्त, शाळेचे मुख्याध्यापक विश्वास जगदाळे, प्रियदर्शनी सावंत व इतर पालक शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.