दैनिक स्थैर्य | दि. ६ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
फलटणच्या ऐतिहासिक नगरीतील मुख्य प्रवेशद्वारावरील म्हणजेच जिंती नाका परिसरामध्ये असणारे भारताचे उपपंतप्रधान, महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री व फलटणचे जावई कै. यशवंतराव चव्हाण साहेब व कै. वेणूताई चव्हाण यांचा संयुक्तिक पूर्णाकृती पुतळा आज कित्येक वर्ष असा ओस का पडला आहे किंवा ठेवला गेला आहे, हे समजत नाही; असे मत सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांनी व्यक्त केले आहे.
फलटण नगरपरिषदेच्या माध्यमातून जर लवकरात लवकर सदरील पुतळा सुशोभीकरण व योग्य ती देखभाल करण्यात आली नाही, तर मोठे आंदोलन उभारणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांनी दिली आहे.