कास महोत्सवाचे आयोजन पालकमंत्री महोदयांच्या हस्ते सकाळी ९ वा. ऑनलाईन उद्घाटन


दैनिक स्थैर्य । दि. ०७ ऑक्टोबर २०२२ । सातारा । सातारा जिल्ह्याच्या कासपठाराला लाखो पर्यटक भेट देतात. या वर्षी पर्यटनाला चालना मिळावी म्हणून पर्यटन विभाग, जिल्हा प्रशासन व वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कास पठाराच्या उपयुक्त लांबीच्या अंतरावर 7 ते 9 ऑक्टोबर 2022 या दरम्यान कास महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते सकाळी 9 वा. उद्घाटन होणार असल्याची  माहिती जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिली.

या महोत्सवाच्या निमित्ताने कास परिसरातील गावाची माहिती देणे, त्यांची वैशिष्ट्यांची माहिती देणे हा उद्देश आहे. तसेच कास जवळच्या गावांना यासाठी मोफत स्टॉल देण्यात येणार आहे. यावेळी वन विभागामार्फत  कास परिसराबद्दल माहितीही पर्यटकांना उपलब्ध करुन दिली जाणार आहे. पर्यटकांच्या करमणूकीसाठी काही वेळासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. या कास महोत्सवाला जास्तीत जास्त नागरिकांनी व पर्यटकांनी भेट द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी  रुचेश जयवंशी यांनी केले आहे.
हा महोत्सव  सकाळी 10   ते सायं 6 वाजेपर्यंत पर्यटकांसाठी खुला असेल.

Don`t copy text!