दैनिक स्थैर्य | दि. २३ जून २०२३ | फलटण |
आंध्र प्रदेश राज्यातील शेतकर्यांच्या पसंतीस पडलेल्या व खर्या अर्थाने के. बी. कंपनीची सेंद्रिय किटकनाशके ही रासायनिक औषधांना एक सशक्त पर्याय निर्माण झाला असल्याची आंध्र प्रदेश राज्यातील शेतकरी वर्गातील चर्चा आहे. ही चर्चा ऐकून त्याच्या उत्सुकतेपोटी भारतातील पहिली बोटॅनिकल आधारित सेंद्रिय-किटकनाशके उत्पादित करणार्या के. बी. उद्योग समूहाच्या फलटण (जि. सातारा) येथील युनिटला आंध्र प्रदेशचे पोलीस महासंचालक श्री. मदिरेड्डी प्रताप आणि त्यांच्या संपूर्ण टीमने भेट दिली. यावेळी कंपनीचे डायरेक्टर श्री. सचिन यादव सर यांनी त्यांचे सन्मानपूर्वक स्वागत केले.
यावेळी त्यांनी के. बी. बायोमधील किटकशास्त्र लॅब, पॅथॉलॉजी विभाग, अॅनालिटिकल लॅब, बॅक्टेरियल लॅब, ५घङ आणि ३ घङ प्लांट एक्सट्रॅक्शन युनिट, १०० आयुर्वेद उत्पादन युनिट, सप्लाय चेन युनिट, झॠठ पॉलीहाउस फील्ड ट्रायल या ठिकाणी भेट दिली. कंपनीच्या सर्व प्रतिनिधींनी त्यांना सर्व युनिट आणि उत्पादनांची माहिती सांगितली.
सेंद्रिय शेती हीच खरी शाश्वत शेती आहे. तसेच आरोग्यास पोषक शेती माल देण्यासाठी आणि जमिनीची सुपिकता टिकवून ती वाढवण्यासाठीची कृषी उत्पादने तयार करण्याचे काम के. बी. कंपनीने केले आहे. भारत देशातील अशी पहिली कंपनी आहे, जी रसायनमुक्त शेती, माती आणि शेतकरी हित असे ध्येय समोर ठेवून उत्कृष्ट काम करत आहे. तसेच आपले काम घेऊन सर्व राज्यात पोहचत आहे, असे यावेळी मनोगतात श्री. मदिरेड्डी प्रताप यांनी सांगितले.
के. बी. कंपनीची सेंद्रिय उत्पादने वापरून देशातील शेतकरी बांधवांनी सेंद्रिय शेतीचा कास धरावी, असेही श्री. मदिरेड्डी प्रताप यावेळी म्हणाले. रासायनिक औषधांना सध्याच्या काळात आणि भविष्यातही के. बी. कंपनीची सेंद्रिय किटकनाशके ही एकमेव व उत्तम पर्याय असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. यावेळी त्यांनी के. बी. बायोचे डायरेक्टर श्री. सचिन यादव सरांचे आणि के. बी. कंपनीचे खूप खूप अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.