चंदूकाका अँड सराफ च्या सोडतीमध्ये ज्योत्स्ना काळे प्रथम

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २७ जुलै २०२२ । बारामती । बारामतीमधील चंदुकाका सराफ अँड सन्स यांच्या वतीने ‘खरेदीसाठी कुपन्स’ योजने अंतर्गत भाग्यवान ग्राहकाची सोडत काढण्यात आली या मध्ये प्रथम क्रमांक ज्योत्स्ना संग्राम काळे द्वितीय क्रमांक सुवर्णा बंडु जगताप आणि तृतीय क्रमांक राजश्री पांढरे या विजेत्या ठरल्या.

रविवार दि. 24 जुलै रोजी जिजाऊ भवन येथे खास महिलासाठी अनिल सावळेपाटील प्रस्तुत होम मिनिस्टर.. खेळ रंगला पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी हाय टेक टेक्सटाईल पार्क च्या अध्यक्षा सुनेत्रा पवार, आमदार अमोल मिटकरी, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपनगराध्यक्ष अभिजित जाधव, नगरसेवक किरण गुजर, नगरसेविका नीलिमा मलगुंडे व दीपक मलगुंडे, संदीप बांदल, भक्ती अभिजित जाधव, दीपक मलगुंडे भगिनी मंडळाच्या अध्यक्षा सौ महाडिक व इतर मान्यवर महिला व सहभागी महिला मोठ्या संख्येने उपस्तित होत्या.

महिलांसाठी मनोरंजन, विविध खेळ,फ्री स्टाइल फुगडी, गाणी, मुलगी वाचवा, लेक शिकवा, पर्यावरण वर आधारित उखाणे हे कार्यक्रम महिलांना व्यक्त होणेसाठी मदत करतात व कला गुणांसाठी हक्काचे व्यासपीठ मिळवून देतात व चंदू काका अँड सन्स मध्ये खरेदीवर सूट असल्याने महिलांना खरेदीचा आनंद घेता येतो गुणवत्ता व दर्जा देताना चंदूकाका अँड सन्स यांनी सामाजिक बांधिलकी जपल्याचे सुनेत्रा पवार यांनी सांगितले.

सदर भाग्यवान विजेत्यांची सोडत चंदूकाका सराफ अँड सन्स चे चेअरमन किशोर शहा-सराफ यांच्या मार्गदर्शनखाली घेण्यात आली.
या प्रसंगी सहभागी व उपस्तित महिलांना खरेदीसाठी कुपन्स देण्यात आले सूत्रसंचालन अनिल सावळेपाटील यांनी केले. मार्केटिंग प्रमुख धनंजय माने यांनी आभार मानले.


Back to top button
Don`t copy text!