दैनिक स्थैर्य | दि. १० डिसेंबर २०२३ | सातारा | अजित जगताप |
महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी सातारा जिल्ह्यातील ज्योतिर्मय फाऊंडेशनने अत्यंत चांगल्या पद्धतीने विश्वासार्हता जपली आहे. त्यामुळेच गेले अनेक वर्ष ज्योतिर्मय महोत्सव यशस्वी ठरला आहे. ग्राहकांची पसंती निर्माण झालेली आहे, असा सार्थ विश्वास सातारा जावलीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यत केला.
सातारा येथील जिल्हा परिषदेच्या मैदानामध्ये उभारण्यात आलेल्या ज्योतिर्मय महोत्सव २०२३ उद्घाघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी ज्योतिर्मय फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष सौ. सुवर्णताई पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, भाजपचे सुनील काटकर, अविनाश कदम, नरेंद्र पाटील, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, शहराध्यक्ष विकास गोसावी, मनीष महाडवाले आदी मान्यवर उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यातील महिला बचत गटांना प्राधान्य देऊन या ठिकाणी २०० स्टॉल उभारण्यात आलेले आहेत. खवय्यापासून खाद्यपदार्थ पापड, चटणी, लोणचे, बेडशीट, स्वेटर, संसार उपयोगी वस्तू, खेळणी, मनोरंजन अशा सर्व व्हरायटी असलेल्या या स्टॉलमुळे एकाच जागी माफक दरात वस्तू उपलब्ध होत आहेत. त्यामुळे याला उदंड प्रतिसाद लाभत आहे.
ज्योतिर्मय फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. सुवर्णाताई पाटील म्हणाल्या, गेल्या दहा वर्षापासून नियमितपणाने महिला सबलीकरणाच्या निमित्ताने हा महोत्सव आयोजित केलेला आहे. ग्रामीण भागातील महिलांना मोफत स्टॉल दिले. त्यामुळे आता त्या स्वकर्तबदारीवर पुणे- मुंबई सारख्या ठिकाणी जाऊन दर्जेदार व गुणात्मक उत्पादन केलेला पदार्थ, वस्तू विक्री करीत आहेत. याचा मनस्वी आनंद होत आहे.
या कार्यक्रमाला सातारा शहरासोबतच जिल्ह्यातील ग्राहक वर्गाने उपस्थित राहून या महोत्सवाचे कौतुक केले. यावेळी रीना जावळे, सौ. कल्पना जगताप, फिरोज पठाण, अॅड. विक्रम पवार, सौ. सुनिशा शहा, वैष्णवी कदम व इतर भाजपा व फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
महोत्सवास सौ. निर्मला पाटील, सौ. स्मिता शिंगटे, सौ. सीमा भाटिया, सौ. राधिका पाटील, सौ. रीना भणगे, सौ. राजश्री दोषी, सईदा नदाफ, अंजुम मनेर, मल्लिका पुजारी, रेणुका शेटे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.