पत्रकार सुजित आंबेकर धमकी प्रकरणी पोलिस अधीक्षकांना पत्रकारांनी दिले निवेदन


दैनिक स्थैर्य | दि. २ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
मराठी पत्रकार परिषदेचे सदस्य सुजित आंबेकर यांना एका बातमी प्रकरणावरून अज्ञात व्यक्तींकडून वारंवार येत असलेल्या धमकीच्या फोन प्रकरणी सातार्‍यातील सर्व पत्रकार संघटनांनी एकत्र येत या अपप्रवृत्तीच्या विरोधात कठोर कारवाई करावी व त्यांना पोलीस संरक्षण द्यावे, या मागणीसाठी पोलीस अधीक्षक समीर शेख यांना निवेदन दिले.

यावेळी राज्याचे उपाध्यक्ष शरद काटकर, जिल्हाध्यक्ष हरिष पाटणे, सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक राहुल तपासे, प्रसिद्धी प्रमुख दीपक शिंदे, डिजिटल मीडिया पत्रकार परिषद राज्य उपाध्यक्ष संतोष (सनी) शिंदे, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे अध्यक्ष ओंकार कदम, चंद्रसेन जाधव, ज्येष्ठ पत्रकार जीवनधर चव्हाण तसेच पत्रकार संघटनेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

पत्रकार सुजित आंबेकर यांनी भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये विचारलेल्या एका प्रश्नाच्या विरोधात त्यांना काही व्यक्तींकडून धमकीचे फोन येत होते. त्यामुळे त्यांच्या जीवितस धोका निर्माण झाल्याने त्यांना तात्काळ पोलिसांचे संरक्षण मिळावे, तसेच त्यांना ज्या अपप्रवृत्तींकडून धमक्या दिला जात आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, या मागणीसाठी सातार्‍यातील मराठी पत्रकार परिषद, सातारा पत्रकार संघ, डिजिटल मीडिया पत्रकार परिषद आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया या सर्व संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी आणि पत्रकार सदस्यांनी पोलीस अधीक्षक समीर शेख यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागणीचे निवेदन दिले. त्यांनी देखील तात्काळ सुजित आंबेकर यांना पोलीस संरक्षण दिले असून त्यांना ज्या व्यक्तींकडून धमकीचे फोन येत आहेत, त्यांच्यावर देखील कठोर कारवाई करण्याचे आश्वासन यावेळी बोलताना दिले.

निवेदन देताना जिल्ह्यातील बहुसंख्य पत्रकार उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!