दैनिक स्थैर्य | दि. 17 मे 2024 | देवगड | महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी तर्फे देण्यात येणारे विशेष दर्पण पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार तथा संस्थेचे अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ यांनी नुकतेच जाहीर केले आहेत. त्यामध्ये फलटण येथील दैनिक गंधवार्ताचे संपादक ॲड. रोहित अहिवळे व दैनिक पुण्यनगरी सातारा आवृत्तीचे फलटण तालुका प्रतिनिधी यशवंत खलाटे यांना जाहीर करण्यात आला आहे.