घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडेला राजस्थानातून अटक


दैनिक स्थैर्य | दि. १७ मे २०२४ | मुंबई |
घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू झाला आहे. बेकायदेशीरपणे होर्डिगं उभारल्याने १७ जीवांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला आरोपी भावेश भिंडेला अखेर मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. राजस्थानच्या उदयपूरमधून भावेशच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं आहे.

राज्यात घाटकोपर दुर्घटनेवरुन चांगलेच राजकारण तापलेल आहे. पोलिस प्रशासन गंभीर होताच, याप्रकरणातील आरोपी भावेश भिडे बेपत्ता झाला होता. भावेश भिंडेच्या मागावर मुंबई पोलिसांची ७ पथकं कार्यरत होती, वेगवेगळ्या भागात भिडेचा पोलिसांकडून शोध सुरु होता, तो राज्याबाहेर पळाल्याचा संशय पोलिसांना होता. त्यानुसार, पोलिसांनी शोधमोहिम राबवली होती. यापूर्वी भिंडेचे शेवटचे लोकेशन लोणावळ्यात आढळलं होतं. मात्र, आज पोलिसांनी भिंडेला राजस्थानमधून अटक केली आहे.

दरम्यान, अपघातातील बचावकार्य गुरुवारी संपले. वास्तविक, घाटकोपरमध्ये पडलेले होर्डिंग १०० फूट उंच होते. अनेक गाड्या, दुचाकी आणि लोक होर्डिंगखाली गाडले गेले. या अपघातात आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला असून ७५ जण जखमी झाले आहेत. बचाव मोहिमेच्या चौथ्या दिवशी बीएमसी आयुक्त भूषण गगराणीही घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पाहणी करून कार्यवाही पूर्ण झाल्याची माहिती दिली.

राजधानी मुंबईतील घाटकोपर दुर्घटनेप्रकरणी पंतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपी भावेश भिंडे आणि जाहिरात कंपनीविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेच्या भीतीने भिंडेने पळ काढला होता, पण अखेर मुंबई पोलिसांचे पथक भिंडेच्या मुसक्या आवळण्यात यशस्वी ठरले आहे. पोलिस मागावर असल्याचे समजताच, पोलिसांचे पथक लोणावळ्यात पोहचण्यापूर्वीच भावेशने आपला मोबाईल बंद केला, त्यानंतर त्याचा कोणताही थांगपत्ता लागलेला नाही. मात्र, पोलिसांनी त्याला जयपूरमधून अटक केली आहे.

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत १७ जणांचा जीव गेला असून ७५ जण जखमी झाले आहेत. प्रशासनाकडून सुरू असलेलं येथील बचावकार्य अखेर ६३ तासांनी संपल्याचं जाहीर करण्यात आलं. पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी घटनास्थाळाची शेवटची पाहाणी करत हे बाचवकार्य संपल्याची घोषणा केली.

होर्डिंग लावलेली जागा रेल्वे पोलिसांची होती. बेकायदा आणि महाकाय होर्डिंग लावायला रेल्वे पोलिसांनीच परवानगी दिली होती. हे बेकायदा काम करणारा महाभाग म्हणजे लोहमार्ग पोलीस आयुक्त कैसर खालीद. सगळे नियम धाब्यावर बसवून या कैसर महाशयांनी इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेडला १० वर्षांच्या काळासाठी होर्डिंग लावायला परवानगी दिली होती.


Back to top button
Don`t copy text!