पत्रकारितेने समाजाला दिशा देण्याचे काम केले – भाजयुमो महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. ०७ जानेवारी २०२३ । मुंबई | आपल्या लेखणीतून समाज जागृतीचे मौलिक कार्य करणारे, समाजाला आरसा दाखविणारे, प्रसंगी रोष पत्करून सत्य समोर आणण्याचे धाडस करणारे, लोकशाहीचा चौथा स्तंभ जीवंत ठेवण्यासाठी पत्रकार आणि पत्रकारितेचे मोठे योगदान असून पत्रकारिताने समाजाला दिशा देण्याचे काम केले आहे असा शब्दात भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री राहुल लोणीकर यांनी पत्रकार बांधवांचा गौरव केला.

मुंबई येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात आयोजित दर्पण दिन व पत्रकार बांधवांच्या सत्कार समारंभ कार्यक्रम प्रसंगी श्री लोणीकर बोलत होते यावेळी माजी खासदार किरिट जी सोमय्या, भाजप महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता केशव जी उपाध्ये यांची प्रमुख उपस्थिती होती पुढे बोलताना श्री लोणीकर म्हणाले की, ६ जानेवारी १८३२ रोजी “दर्पण” सुरू करून बाळशास्त्री जांभेकर यांनी तत्कालीन इंग्रज राजवटी विरोधात भारतातील जनसामान्यांची भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला होता आजही समाज भावना मांडण्याचे काम पत्रकारितेच्या माध्यमातून केले जात असून पत्रकारितेला समाज मनाचा आरसा वाटल्यास वावगे ठरणार नाही.

अटल युवा पर्व अंतर्गत २५ डिसेंबर ते १२ जानेवारी या दरम्यान भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये २५ डिसेंबर रोजी स्वर्गीय अटलजी यांच्या जन्मदिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते संघटनात्मक ६२ जिल्ह्यांमध्ये सदरील वक्तृत्व स्पर्धा अत्यंत जोरदारपणे संपन्न झाली असून दिनांक पाच जानेवारी रोजी वसंत स्मृती भाजपा कार्यालय मुंबई येथे राज्यस्तरीय स्पर्धा संपन्न झाली त्यामध्ये प्रथम पारितोषिक रोहित खर्चवाल द्वितीय पारितोषिक नेहा पाटील तृतीय पारितोषिक प्रथमेश उंबरे यांनी पटकावले या तीनही स्पर्धकांना केंद्रीय पातळीवर आयोजित स्पर्धेमध्ये संधी दिली जाणार असल्याची माहिती देखील यावेळी लोणीकर यांनी दिली.

अटल युवा पूर्वअंतर्गत आयोजित विविध कार्यक्रमांमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती, दि.६ जानेवारी रोजी दर्पण दिनानिमित्त पत्रकार बांधवांचा एकाच वेळी संपूर्ण महाराष्ट्रात युवा मोर्चाच्या वतीने सत्कार करण्यात आला यापूर्वी कोणत्याही पक्षाने संपूर्ण महाराष्ट्रभर एकाच दिवशी एकाच वेळी एवढा सर्व पत्रकारांचा सत्कार व सन्मान कदाचित कुणीही आयोजित केलेला नव्हता भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने पत्रकारांचा यथोचित सत्कार व्हावा या उद्देशाने संपूर्ण महाराष्ट्रभरात संघटनात्मक ५६ पेक्षा अधिक जिल्ह्यांमध्ये पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आला यासाठी प्रदेश कार्यकारणी मधील सर्व सदस्य सर्व संघटनात्मक जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष यांनी प्रचंड मेहनत घेऊन महाराष्ट्रभरातील साधारणपणे ४००० पेक्षा अधिक पत्रकारांचा सत्कार यावेळी करण्यात आला अशी माहिती देखील यावेळी श्री लोणीकर यांनी दिली.

यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे समन्वयक योगेश मैंद, निखिल चव्हाण, बागल कुलकर्णी, सुदर्शन पाटसकर, अरुण पाठक, रवी तिवारी नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख यांच्यासह भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश पदाधिकारी कार्यकर्ते पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!