जोशी हॉस्पिटलने पुन्हा केली मोठी कामगिरी; १५ वर्षांच्या मुलाच्या खुब्याचे सांधे यशस्वीपणे बदलले

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Channel Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । 21 मे 2025 । फलटण । येथील जोशी हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेडने १५ वर्षांच्या एका तरुण मुलावर खुब्याच्या सांधे (Total Hip Replacement Surgery) यशस्वीपणे सांधेरोपण केले. हा हॉस्पिटलच्या रेकॉर्डनुसार आतापर्यंतचा सर्वात लहान वयाचा पेशंट असून त्याच्या सांधेरोपण शस्त्रक्रियेने नवे मानदंड स्थापित केले आहेत.

९ महिन्यांपूर्वी या मुलाचा खुब्याचा हाड मोडल्याने दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये screw बसवण्याच्या शस्त्रक्रियेचा उपयोग करण्यात आला होता. मात्र, त्यामुळे खुब्याच्या सांध्याचा रक्तपुरवठा थांबल्याने सांधा खराब झाला आणि मुलाला प्रचंड वेदना सहन कराव्या लागल्या. तो स्वतंत्रपणे चालण्यास असमर्थ झाला तर त्याचा पाय जवळपास २ सेमी छोटा झाला. मुलाचा दैनंदिन जीवन देखील गंभीरपणे प्रभावित झाला.

जोशी हॉस्पिटलमध्ये करण्यात आलेल्या संधेरोपण शस्त्रक्रियेत खराब झालेला खुब्याचा सांधा काढून टाकून त्याऐवजी जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीचा Ceramic on Poly प्रकारची ४० वर्ष टिकणारी सांधे बसवण्यात आली. ऑपरेशन नंतर मुलाचा पाय परत सारख्या लांबीचा झाला असून तो स्वतंत्रपणे चालण्यास आणि दैनंदिन जीवन सुसह्यपणे जगण्यास सक्षम झाला आहे.

प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. प्रसाद जोशी यांनी सांगितले की, “हा १५ वर्षांचा मुलगा जोशी हॉस्पिटलच्या इतिहासातील सर्वात लहान वयाचा पेशंट आहे, ज्यावर सांधेरोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. यामुळे त्याचा पूर्ण तारुण्याचा कालावधी न्यून वेदना व आनंदाने जगण्यास सक्षम होईल. कोरोनानंतर लहान वयात अनेक आजार दिसू लागले आहेत. त्यामुळे शरीराची काळजी घेणे, मेडिक्लेम करणे, सात्विक आहार, व्यायाम आणि सकारात्मक विचार यांचं पालन करणं अत्यंत आवश्यक आहे.”

Ceramic on Polyethylene प्रकारच्या सांध्याचे अत्यंत टिकाऊ व कमी घर्षण होणारे वैशिष्ट्य असल्याने याचा वापर करताना पुढील ४० वर्ष त्याचा उपयोग होणार आहे. या प्रकारच्या सांध्यामुळे घर्षण कमी होतो आणि सांध्याची काळजी घेणे अधिक सोपे होते. जोशी हॉस्पिटलमध्ये अशा प्रकारची शस्त्रक्रिया अत्यंत कमी वयातील पेशंटवर करणे हा एक मोठा वैद्यकीय टप्पा ठरला आहे.

या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे जोशी हॉस्पिटलने फलटणमध्ये आणि आसपासच्या भागात मेडिकल क्षेत्रात एक नवे कीर्तिमान स्थापित केले आहे. भविष्यात असेच आव्हानात्मक प्रकरणं यशस्वीपणे हाताळण्याची हॉस्पिटलची तयारी असून, स्थानिक लोकांसाठी आरोग्य सेवांचं दर्जा वाढवण्याचा मानस आहे.


Back to top button
Don`t copy text!