मोफत वीज वापरण्यासाठी आजच ‘प्रधानमंत्री सूर्यघर योजने’त सहभागी व्हा!

फलटण शहर भारतीय जनता पार्टी आणि माऊली फौऊंडेशन, फलटण यांच्याकडून आवाहन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १ सप्टेंबर २०२४ | फलटण |
आपल्या घराच्या छतावर रुफ टॉप सोलर सिस्टीम बसवून मोफत वीज मिळविण्यासाठी ‘प्रधानमंत्री सूर्यघर मोफत योजना २०२४’ केंद्र सरकारने सुरू केली आहे. या योजनेत सहभागी होऊन फलटणकरांनी मोफत वीज वापरावी, यासाठी फलटण शहर भारतीय जनता पार्टी आणि माऊली फौऊंडेशन, फलटण यांच्याकडून संपर्क केंद्र स्थापन करण्यात आले आहे.

या योजनेत घर सोलर करून शासनाकडून ३०,०००/- ते ७८,०००/- पर्यंत सबसीडी मिळवता येते. या योजनेत सहभागी होण्यासाठी ग्राहकांना ८०% पर्यंत कर्जाची सोय उपलब्ध केली आहे.

प्रधानमंत्री सूर्य घर योजनेद्वारे ग्राहकांना मिळणारे फायदे :

  • संपूर्ण घर सौरऊर्जेवर बिनधास्त चालवा.
  • घराच्या छतावर रुफ-टॉफ सोलर वीज निर्मिती प्रकल्प बसवून सौर ऊर्जेचा वापर करुन वीज निर्मिती करायची व वीज वापरुन
  • विजेची गरज पूर्ण करायची.
  • कर्जाच्या रकमेची परतफेड ३ ते ५ वर्षात करता येते.
  • सोलर पॅनेलच्या साफसफाई व्यतिरिक्त देखभालीचा खर्च नाही.
  • घराच्या छतावर रुफ टॉप सोलर सिस्टीम बसवून मोफत वीज मिळविण्यासाठी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत योजनेत सहभागी व्हा.
  • ८०% पर्यंत कर्ज उपलब्ध करुन देण्याची सोय.
  • सोलर ऊर्जेसाठी घेतलेल्या कर्जावर ७% ते ११% पर्यंत व्याजदर. ३० ते ७८ हजारापर्यंत सबसीडी.
  • निवासी घरासाठी वीज मोफत
  • स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये २% ते ५% करामध्ये सवलत व प्राप्तीकरात सूट मिळते.

या योजनेत सहभागी होण्यासाठी संपर्क :

अनुप शहा (फलटण शहर अध्यक्ष, भाजपा)
मो. ९६८९९४१००८/८०१०६४१०१२

मयुर जठार, विशाल लोखंडे (सिद्धेश्वर इलेक्ट्रीकल इंजिनियर अ‍ॅण्ड कॉन्ट्रॅक्टर)
मो. ७०२०९१५०५६/८१०८४२६९७८

अभिजीत मठपती
मो. ९९७५८५७९९३

प्रधानमंत्री सूर्य घर योजनेसाठी लागणारी कागदपत्रे :
१) ग्राहक हा भारतीय नागरिक असावा.
२) सूर्य घर योजनेसाठी छतावर पुरेशी जागा असावी.
३) वीज कनेक्शन जोडलेले असणे आवश्यक आहे.
४) लाईट बील
५) १००/- रु. चे ३ स्टॅम्प

कर्ज प्रकरणासाठी लागणारी कागदपत्रे
१) आधारकार्ड २) पॅनकार्ड ३) रेशनिंग कार्ड
४) सिक्युरिटी / कॅन्सल चेक फॉर्म भरण्यासाठी
५) चालू वर्षाचे १ वर्षाचे बँक स्टेटमेंट ‘क्यूआर’ कोड
६) आयटीआर भरलेला असल्यास आयटीआर
७) नोकरदार असल्यास पेमेंट स्लीप
८) आयकार्ड साईज ३ फोटो

ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी लिंक :
https://forms.gle/1cya3QzasAF6E3mg7

फॉर्म भरण्याचे ठिकाण :

फलटण शहर भाजपा कार्यालय :
स्वराज पतसंस्थेसमोर, मेटकरी कॉम्प्लेक्स,
फलटण वेळ : सकाळी १० ते दु. १ वा.

अनुप शहा यांचे संपर्क कार्यालय :
‘अहिंसा भवन’, शुक्रवार पेठ,
फलटण. वेळ : दुपारी ३ ते दु. ५ वा.


Back to top button
Don`t copy text!