स्थैर्य, मुंबई, दि.०२: कोव्हिड-१९ च्या अभूतपूर्व उद्रेकामुळे मनोरंजन उद्योगातील प्रत्येक कामात अडथळा निर्माण झाला. अनेक नवीन रिलीज पुढे ढकलण्यात आले. सुरु असलेल्या मालिकांचे पुनर्प्रक्षेपण सुरु झाले. याचा परिणाम म्हणून जेएल स्ट्रीम- हे सोशल लाइव्ह स्ट्रीमिंग अॅप सेलिब्रेटिज आणि इन्फ्लूएंसर्सना त्यांच्या चाहत्यांशी थेट प्रभावीपणे बोलण्याकरिता सर्वात पसंतीचे संवादाचे माध्यम म्हणून उदयास आले.
जानेवारी २०२१ मध्ये लाँच झालेल्या या मेड-इन-इंडिया स्टार्टअपने ऑनलाइन कंटेंट निर्मात्यांमध्ये मोठी प्रसिद्धी मिळवली. ५००,००० डाउनडोड्ससह १००,००० अमेरिकन डॉलरपेक्षा जास्त मासिक महसूल जमवत या अॅपने अभिनेत्यांमध्ये आधीच प्रसिद्धी मिळवली आहे. त्यात कविता कौशिक, पलक मुच्छल, जसबीर जस्सी, दलजीत कौर, पूजा मिश्रा, अली कुली मिर्झा आणि सोफी चौधरी आदींचा समावेश आहे.
जेएल स्ट्रीम (जल्दी लाइव्ह) ने संपूर्ण भारतातील ऑनलाइन कंटेंट मार्केटमध्ये बदल घडवला. स्ट्रीमर्सना त्यांच्या कंटेंटवर कमाई करण्याची तसेच तत्काळ तो पैसा काढून घेण्याची सुविधा याने पुरवली. तसेच जगभरातील समविचारी लोकांचा समूह उभारण्यासाठीही या प्लॅटफॉर्मने मदत केली.
चीन वगळता जगभरातील गूगल प्लेस्टोअर आणि आयओएस अॅप स्टोअरवर हे अॅप डाउनलो़डसाठी उपलब्ध आहे. जगभरातील कोणत्याही ठिकाणचा संभाव्य समविचारी जोडण्याची स्ट्रीमर्सना परवानगी आहे. तसेच त्यांच्यासोबत मॅसेज किंवा व्हिडिओ कॉलद्वारे थेट बोलताही येते. यासाठी जेएल स्ट्रीमर्सना फक्त स्वत:चे तपशील द्यावे लागतात. उदा. छंद आणि व्होइला. यानंतर जगातील सर्वात समविचारी व्यक्तीशी कनेक्ट होण्यासाठी तुम्ही सज्ज राहता. सर्जनशील आणि सुसंवादी ऑनलाइन कंटेंटवरील प्रेमाद्वारे स्ट्रीमर्समध्ये शांतता आणि सुसंवाद प्रस्थापित करण्याचा उद्देश या अॅपचा आहे.