जितोबा विद्यालयाचे शिष्यवृत्ती परीक्षेत

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ८ जुलै २०२४ | फलटण |
जिंती (तालुका फलटण) येथील रयत शिक्षण संस्थेचे श्री जितोबा विद्यालयातील विद्यार्थी आठवीमधील हर्षवर्धन अमोल जाधव व प्रणित सचिन रणवरे यांनी शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे, तर कु. जिया अकिल तांबोळी ही शिष्यवृत्तीस पात्र ठरली आहे. एनएमएमएस सारथी शिष्यवृत्ती परीक्षेत ओम रत्नराज रणवरे व अर्णव मारुती रणवरे शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत.

या विद्यार्थ्यांना श्री. ताराचंद्र आवळे, विभाग प्रमुख सौ. व्ही. एस. जमदाडे, सौ. जगताप पी. जे. विभाग प्रमुख श्री. ए. आर. सोळंकी, सौ. बनकर एस. एस. यांनी मार्गदर्शन केले.

या यशाबद्दल यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे सचिव विकास देशमुख, माध्यमिक विभागाचे सहसचिव बी. एन. पवार, मध्य विभागाचे विभागीय अधिकारी राजेंद्र साळुंके, सहाय्यक विभागीय अधिकारी निकम, श्री. दिनेश दाभाडे, स्कूल कमिटी सदस्य राजेंद्र रणवरे, श्री. पी.एन. रणवरे, श्री.एम. एन. रणवरे, श्री. नवनाथ रणवरे, सरपंच पल्लवी लोखंडे, प्रभारी मुख्याध्यापक श्री ताराचंद्र आवळे. श्री. शरद रणवरे, श्री. जगदेवराव रणवरे तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.

ग्रामीण भागातील या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.


Back to top button
Don`t copy text!