दैनिक स्थैर्य | दि. 02 मे 2024 | फलटण | माढा लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा लोकसभेच्या रिंगणात उतरवले गेले आहे. उमेदवारी जाहीर झाल्यापासून खासदार रणजितसिंह हे फलटण तालुक्यात कार्यकर्ता बैठक घेत आहेत परंतु जाहीर सभा अद्याप घेतली नाही. त्यांचा प्रचार हा खासदार रणजितसिंह यांच्या सुविज्ञ पत्नी सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी संपूर्ण फलटण तालुका पिंजून काढून रणजितसिंह यांना मताधिक्य देण्यासाठी त्या कार्यरत आहेत.
सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांनी फलटण शहरामधील प्रत्येक प्रभागात पदयात्रा काढत घर ते घर प्रचार केला आहे. यासह फलटण तालुक्यातील प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये त्यांनी बैठका घेत दणक्यात पदयात्रा पार पडल्या आहेत.
गत काही वर्षांपासून सौ. जिजामाला यांनी फलटण शहरासह तालुक्यात महिला वर्गाला एकत्र केले आहे. फलटण तालुक्यातील बहुतांश सर्वसामान्य महिला ह्या थेट सौ. जिजामाला यांच्याशी कनेक्ट आहेत. त्यांनी महिलांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी व महिलांना एक हक्काचे व्यासपीठ तयार करण्यासाठी “स्वराज फौंडेशन” स्थापन केले आहे. “स्वराज फौंडेशन” च्या माध्यमातून सौ. जिजामाला यांनी मोठे जाळे निर्माण केले आहे. याचा फायदा नक्कीच खासदार रणजितसिंह यांना होणार असल्याचे मत व्यक्त होत आहे.
फलटण तालुक्यामध्ये असणाऱ्या स्वराज कारखान्यामुळे फलटण तालुक्यासह कोरेगाव, माळशिरस तालुक्यातील ऊस पिकवणारा शेतकरी हा खासदार रणजितसिंह यांच्याशी थेट जोडला गेला आहे. स्वराज कारखान्याचा कारभार हा सौ. जिजामाला ह्या सक्षमपणे बघत आहेत. शेतकरी वर्गाच्या अडीअडचणीला सौ. जिजामाला ह्या उभे राहिल्याने अनेक शेतकरी यामुळे खासदार रणजितसिंह यांच्याकडे जोडण्यात सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर ह्या यशस्वी झाल्या आहेत.