राज्यातील महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत आले पाहिजे : ॲड. सौ. जिजामाला; “घड्याळ” चिन्हाच्यासमोर मतदान करा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १४ नोव्हेंबर २०२४ | फलटण | महाराष्ट्र शासनाने सुरु केलेल्या लाडकी बहीण व अन्य योजना अखंडित सुरु राहण्यासाठी आणि विकासाच्या अनेक योजना गतिमान करण्यासाठी राज्यातील महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत आले पाहिजे, त्यासाठी सचिन सुधाकर पाटील यांच्या घड्याळ या निवडणुक चिन्हा समोरील बटण दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन ॲड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांनी केले आहे.

सातारा जिल्हा परिषद व जिल्हा नियोजन मंडळ माजी सदस्या ॲड. सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आपल्या सहकारी महिला व महायुतीचे पदाधिकारी/कार्यकर्ते यांच्या समवेत फलटण शहरातील विविध प्रभागात पदयात्रेद्वारे मतदार बंधू – भगिनी यांच्या भेटी घेऊन त्यांना सचिन पाटील यांना मतदान करण्याचे आवाहन केले. शहरवासीयांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करुन सचिन पाटील यांना मतदान करण्याचे आश्वासन दिले.

माजी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी गेल्या ५ वर्षात फलटण शहर व तालुक्यात केलेली विकास कामे आणि सर्वसामान्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी केलेले प्रयत्न, अहोरात्र घेतलेली मेहनत, केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांमधून आणलेला निधी, त्यातून उभी राहिलेली विकास कामे विशेषतः जिल्हा न्यायालय, आरटीओ ऑफिस, अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय, सिंचन भवन, सुरवडी येथे अतिरिक्त तहसील कार्यालय मंजूर करुन घेतल्यामुळे लोकांचा सातारला जाण्यायेण्याचा वेळ व पैसा वाचणार असल्याचे ॲड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले.

फलटण शहरातील रस्त्यांची दुरावस्था दूर करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून सुमारे ७५ कोटी रुपयांचा भरीव निधी आणून शहरातील रस्ते सिमेंट काँक्रीटचे करणे, शहर सुशोभीकरण करणे याला प्राधान्य देत तीर्थक्षेत्र अशी मान्यता असलेल्या या शहरातून वाहणारी सांस्कृतिक, ऐतिहासिक, पौराणिक महत्त्व असलेली बाणगंगा नदी स्वच्छ व वाहती राहिली पाहिजे, तेथे बगबगीचा व सुशोभीकरण झाले पाहिजे यासाठी आराखडे, अंदाजपत्रक करुन निधीची तरतूद करुन घेणे, शहरातील वाहतुकीला शिस्त आणि वाहनतळाची पुरेशी व्यवस्था यासाठी करण्यात आलेले नियोजन या बाबी लक्षात घेतल्या तर आगामी काळात फलटण बारामतीच काय त्यापेक्षा उत्तम शहर होईल त्यासाठी सचिन पाटील यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा असे आवाहन ॲड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांनी केले आहे.

लोणंद – फलटण – बारामती रेल्वे मार्गापैकी लोणंद – फलटण रेल्वे मार्ग पूर्ण झाला असून त्यावरुन रेल्वे वाहतूक सुरु आहे, तर फलटण – बारामती रेल्वे मार्गाचे काम सुरु असून आगामी वर्षभरात त्यावरुनही रेल्वे वाहतूक सुरु होईल तर फलटण – पंढरपूर हा ब्रिटिश काळापासून प्रलंबीत असलेला रेल्वे मार्ग नव्याने मंजूर करुन घेऊन त्यासाठी निधीची तरतूद झाल्याने लवकरच त्यामार्गावर रेल्वे वाहतूक सुरु होईल, फलटण – बारामती, फलटण – सातारा राज्य रस्ते सिमेंट काँक्रीटचे होत असल्याने त्याचा लाभ ही लवकरच मिळणार असल्याचे ॲड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले.

अगोदरच्या २५/३० वर्षात या शहर व तालुक्यात विकास दूर सर्वसामान्यांच्या अपेक्षा पूर्णत्वास गेल्या नाहीत हे लक्षात घ्या आणि सचिन पाटील यांना बहुमताने विजयी करा तुमचा एकही प्रश्न प्रलंबित राहणार नाही कारण त्याच्या पूर्ततेसाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची संपूर्ण ताकद सचिन पाटील यांच्या पाठीशी राहणार असल्याचे ॲड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांनी ठणकावून सांगितले.

फलटण शहर स्वच्छ, सुंदर करण्याबरोबर येथील वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण, रस्ते, वाहनतळ, शहर वाहतूकीचे नियोजन, सुरक्षितता वगैरे सर्व नागरी सुविधा दर्जेदार आणि पुरेशा प्रमाणात शहरवासीयांना उपलब्ध झाल्या पाहिजेत, एस. टी. बस वाहतूक व स्वच्छ, सुशोभित बस स्थानक उभारण्याची आवश्यकता लक्षात घेऊन त्याला प्राधान्य देण्याची ग्वाही ॲड. सौ. जिजामाता नाईक निंबाळकर यांनी दिली.

संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याच्या मार्गावरील प्रमुख शहर व प्राचीन तीर्थ क्षेत्र असल्याने येथील मंदिरांच्या परिसरात विशेष स्वच्छता, तेथे सुलभच्या धर्तीवर स्वच्छता व स्नानगृहे उभारणी, उत्तम बागबगीचे तेथे ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष व्यवस्था करण्याचा आमचा प्रयत्न राहील याची ग्वाही ॲड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांनी दिली.


Back to top button
Don`t copy text!