दैनिक स्थैर्य | दि. २५ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
जिंती (ता. फलटण) येथे २२ ते २३ ऑटोबरदरम्यान बंद घराचा कोयंडा तोडून चोरट्यांनी घरातील एकूण ४२ तोळ्यांचे दागिने किंमत अंदाजे १७ लाख १२ हजार रूपये लंपास केले आहेत. या चोरीची नोंद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे. याची फिर्याद घरमालक आदित्य अशोक रणवरे (रा. जिंती) यांनी पोलिसात दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, जिंती (ता. फलटण) येथे २२ ते २३ ऑटोबरदरम्यान फिर्यादीच्या राहत्या घराचा बंद दरवाजा अज्ञात चोरट्याने कोयंडा उचकटून तोडून घरात प्रवेश केला. यावेळी चोरट्यांनी बेडमधील फर्निचरच्या कपाटातील सोन्याचे सुमारे १९ तोळे ८ ग्राम वजनाचे दागिने व दुसर्या बेडमध्ये असणारे एकूण सुमारे ९ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व इतर १४ तोळे दागिने असे एकूण ४२ तोळे ८ ग्रॅम वजनाचे सुमारे १७ लाख १२ हजार रुपये रकमेचे सोन्याचे दागिने घरफोडी करून चोरून नेले आहेत.
या चोरीचा अधिक तपास पीएसआय अरगडे करत आहेत.