
स्थैर्य, नवी दिल्ली, दि.४: जेईई-एनईईटी रद्द करण्याची मागणी करणार्या सहा राज्यांची याचिका सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी फेटाळली. 17 ऑगस्टच्या कोर्टाच्या निकालाचा आढावा देखील याचिकेत मागवण्यात आला आहे.
28 ऑगस्टला दाखल करण्यात आली होती याचिका
कोर्टाने 17 ऑगस्टच्या निर्णयात परीक्षेचे शेड्यूल ठरवण्याचे आदेश दिले होते. या निर्णयाविरोधात 28 ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली होती. याचिका दाखल करणाऱ्या राज्यांमध्ये पंजाब, झारखंड, पश्चिम बंगाल, राजस्थान, छत्तीसगड आणि महाराष्ट्राचा समावेश आहे.
महामारी आणि पुरामुळे परीक्षा स्थगित करण्याची मागणी
देशभरात महामारी आणि अनेक राज्यांमध्ये पुरपस्थिरी निर्माण झाली आहे. हे लक्षात घेता विद्यार्थी, पालक, अनेक विद्यार्थी संघटना आणि राजकीय दलांनी परीक्षा स्थिगत करण्याची मागणी केली होती. तर नॅशनल टेस्टिंग एजेंसीने विरोध असूनही कोरोनापासून बचावासाठी आवश्यक गाइडलाइंसह जेईई मेन 1 सप्टेंबरपासून सुरू केली आहे. ही 6 सप्टेंबरपर्यंत चालेल. तिकडे, मेडिकलमध्ये अॅडमिशनसाठी होणारी नीट 13 सप्टेंबरला घेतली जाणार आहे.