स्थैर्य, फलटण, दि.१८: वाखरी (ता.फलटण) गावचे सुपूत्र, जयेश रामचंद्र ढेकळे यांनी आपल्या आर्या बॅग, मुंबई या उद्योग समूहाच्या माध्यमातून वाखरी येथील कोविड मदत कक्षास 1 लाख रुपयांची भरघोस मदत केली आहे. सदरची मदत ही वस्तू स्वरुपात असून यामध्ये 2000 मास्क आणि 2000 सॅनिटायझरच्या बाटल्यांचा समावेश आहे. सदरची मदत तहसिलदार समीर यादव यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.
या मदतीबद्दल जयेश ढेकळे यांना प्रांताधिकारी डॉ.शिवाजीराव जगताप, तहसिलदार समीर यादव, पोलीस उपनिरीक्षक बोंबले यांच्यासह ग्रामस्थांनी धन्यवाद देवून कौतुक केले. या मदत कार्यासाठी भानुदास ढेकळे यांचे सहकार्य लाभले.