जय भवानी एज्युकेशन सोसायटीच्या आदर्श शिक्षक पुरस्कारांचे उद्या सह्याद्री कदम यांच्या हस्ते वितरण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ४ सप्टेंबर २०२३ | फलटण |
स्व. माजी आमदार श्री. सूर्याजीराव उर्फ चिमणराव शंकरराव कदम यांनी स्थापन केलेल्या जय भवानी एज्युकेशन सोसायटी गिरवी (ता. फलटण, जि. सातारा) यांच्याकडून दिल्या जाणार्‍या आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण उद्या, मंगळवार, दि. ५ सप्टेंबर २०२३ रोजी सायंकाळी ४.०० वाजता करण्यात येणार आहे. एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. सह्याद्री सूर्याजीराव उर्फ चिमणराव कदम (भैय्या साहेब) यांच्या हस्ते फलटण येथील सजाई गार्डन, विमानतळाशेजारी, विंचुर्णी रोड येथे हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सौ. प्रभावती कोळेकर, तसेच उपशिक्षणाधिकारी तेजस गंबरे व फलटण पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी सौ. शाहीन पठाण यांची उपस्थिती असणार आहे.

या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जय भवानी एज्युकेशन सोसायटीतर्फे करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!