दैनिक स्थैर्य | दि. ४ ऑक्टोबर २०२३ | सातारा |
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार पुण्याच्या पालकमंत्री पदासाठी आधीपासून आग्रही होते. त्यांना पालकमंत्रीपद देणे हे आधीच ठरले होते. मंत्रीपद बदलणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अधिकार आहे. जे ठरलं होतं तेच घडलेलं आहे. अजितदादा स्पष्टवक्ते आहेत, ते कधीही नाराज नव्हते. त्यामुळे त्यांच्या नाराजीचे वक्तव्य करून कोणीही वेगळा अर्थ काढू नये, असे स्पष्टीकरण भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
सातार्यातील कनिष्क मंगल कार्यालयात तीनशे कार्यकर्त्यांची प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बावनकुळे बोलत होते.
बावनकुळे म्हणाले, भाजप आमदारांची महायुतीमध्ये संख्या जास्त आहे. या नात्याने मोठा घटक पक्ष आहे गेल्या नऊ वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी जी कामे केली त्याची स्वतंत्र पुस्तिका छापून आम्ही वॉरियर्सच्या माध्यमातून घरोघरी पोहोचवण्याचे काम सुरू केले आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सातार्याचा लोकसभेचा उमेदवार हा पार्लमेंटरी बोर्डाकडून ठरवला जाईल व तो भाजपचा की घटक पक्षाचा याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वित्तमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे पार्लमेंटरी बोर्ड बसून निर्णय घेणार आहे आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री असावा असे सर्वांनाच वाटत असतील त्यामुळे भाजपचा मुख्यमंत्री व्हावा अशी आमची ही अपेक्षा गैर नाही मंडल प्रमुख आणि बूथ प्रमुख यांच्या माध्यमातून पक्षाचा कार्यक्रम व्यवस्थितपणे राबवण्याचे काम सुरू आहे. मात्र इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी जनतेला गोंधळात टाकण्याचे काम केले आहे.घटक पक्ष डीएमके नेता उदयानिधी स्टॅलिन यांनी हिंदू धर्म नष्ट करण्याची भाषा वापरली आहे.हे इंडियाच्या नेते शरद पवार,नाना पटोले यांना मान्य आहे काय? असा सवाल बावनकुळे यांनी केला .
महाराष्ट्रात ४५ खासदार निवडून आणण्याचे उदिष्ट आहे.सातारा लोकसभेसाठी सुध्दा योग्य वेळ आल्यानंतर तुम्हाला बदल दिसून येतील असे ते म्हणाले .बुधवारी राज्य सरकारने नऊ जिल्ह्याचे पालकमंत्री जाहीर केले यामध्ये पुण्याच्या पालकमंत्रीपदी अजित दादा पवार यांना संधी देण्यात आली यासंदर्भात बावनकुळे यांना विचारले असता ते म्हणाले पालकमंत्री बदलणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अधिकार आहे जे ठरलं होतं तेच आहे अजित दादा कधीही नाराज नव्हते ते स्पष्ट वक्ते आहेत घटक पक्ष म्हणून महायुती आघाडी काम करत आहे नऊ जिल्ह्याचे नऊ नव्याने पालकमंत्री आल्यामुळे सरकारचा परफॉर्मन्स वाढला आहे ज्या जिल्ह्यांना पालकमंत्री नव्हते त्यांना पालकमंत्री मिळाल्यामुळे त्या जिल्ह्यांच्या विकासाला मदत होणार आहे पालक मंत्री नेमले गेले याचा कोणीही राजकीय अर्थ काढू नये असे आवाहन त्यांनी केले गेल्या ४८ तासांमध्ये नांदेड आणि औरंगाबाद येथे सरकारी आरोग्य यंत्रणेच्या अनास्थेमुळे जे बळी गेले त्या संदर्भात बावनकुळे यांना विचारले असता ते म्हणाले सरकारी आरोग्य यंत्रणेवर स्वतः मुख्यमंत्री काम करत आहेत या संदर्भात आरोग्य यंत्रणेकडे समितीकडून माहिती घेतली जात आहेत आरोग्य विषयक पायाभूत सुविधा कशा दिल्या जातील याविषयीचा आराखडा करण्याचे काम सुरू आहे.
मुख्यमंत्री हे महायुती आघाडीचे दमदार मुख्यमंत्री असून योग्य तो ते निर्णय घेतील १६ आमदारांच्या अपात्रते संदर्भात बोलताना बावनकुळे म्हणाले तुम्हा पत्रकारांचा असा प्रश्न असेल तर मी स्वतः तुम्हाला मुंबईला राहून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे घेऊन जातो तुम्ही तो प्रश्न त्यांनाच विचारा मात्र आगामी २०२४ च्या निवडणुकांपर्यंत महायुती सरकारचे एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री आहेत असे बावनकुळे यांनी ठामपणे सांगितले.