दैनिक स्थैर्य । दि. १२ मे २०२३ । पुणे । फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फाऊंडेशन व राष्ट्रीय ओबीसी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने जोतीराव फुले यांना 11 मे 1888 ला 61 व्या वर्षी सलग 40 वर्षे आहोरात्र निस्वार्थी जनसेवा केली म्हणून महात्मा पदवी दिली गेली त्या दिनाचे औचित्य साधून आज 11 मे 2023 रोजी 135 वर्षे पूर्ण झाली म्हणून समता भूमी येथे महात्मा फुले वाड्यात सायं.5.30 वाजता नटश्रेष्ठ कुमार आहेर यांना माजी आमदार दीपक पायगुडे, बाळासाहेब आमराळे आणि सावित्रीची लेक ऋतुजा यांचे शुभहस्ते महात्मा फुले पगडी,महात्मा फुले उपरणे, फुले दाम्पत्य फोटोफ्रेम आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले तर महात्मा फुले वाड्याचे पीएमसी सुरक्षा रक्षक नितीन लोखंडे यांचा शाल , ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले,महात्मा फुले गीत चरित्र आणि सन्मानपत्र सामाजिक कार्यकर्ते श्री व सौ.संतोष पंडित आणि सौ.पालवे यांचे शुभहस्ते देण्यात आले.आणि प्रमुख पाहुणे जेष्ठ पत्रकार मंदार जोशी,कवी विठ्ठल गायकवाड आणि माजी आमदार दीपक पायगुडे यांचा सन्मान शाल,फुले दाम्पत्य ग्रंथ भेट देऊन अध्यक्ष सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी सन्मान केला.
या प्रसंगी आमदार पायगुडे म्हणाले की नुकतेच 11 एप्रिल रोजी कुमार आहेर यांची पूर्ण कार्याची माहिती आणि परिपूर्ण ओळख झाली आणि आज त्यांना 11 मे महात्मा दिनी माझे हस्ते पुरस्कार तसेच या वाड्याचे सुरक्षा रक्षक नितीन लोखंडे यांचा सन्मान हा सोहळा सत्यशोधक ढोक यांनी घडवून आणला म्हणून त्यांचे आभार मानले. पुढे पायगुडे म्हणाले की या वाड्याचे रक्षण करण्याचे काम लोखंडे व त्यांचे सहकारी करतात तसे या फुले वाड्याचे जागरूक पहारेकरी व जबाबदार नागरिक म्हणून पावित्र्य राखणे आपले आद्य कर्तव्य आहे. तसेच या वाड्यात फुले जयंती द्वी शताब्दी महोत्सव सोहळा ऐतिहासिक साजरा करावयाचा असल्याने आतापासूनच लोकसहभागातून तयारी करू असे देखील त्यांनी आवाहन केले.
सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी स्वागत व प्रास्ताविक मद्ये संस्था महाराष्ट्र , तेलगणा व राजस्थान मद्ये सत्यशोधक कार्य आणि सामजिक उपक्रम व फुले साहित्य प्रकाशित करीत असल्याची माहिती दिली तर प्रा.पांडुरंग गाडेकर यांनी सूत्रसंचालन केले आणि रमाकांत दरवडे,रोहित धेंडे , एकनाथ ढोले,दिलीपराज वाघमारे यांनी मोलाची मदत केली.शेवटी कुमार आहेर यांनी महात्मा फुले रचित सत्याचा अखंडाचे गायन करीत सर्वांकडून गाऊन घेतले.यावेळी मोठ्या संख्येने विविध संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.