दैनिक स्थैर्य । दि. १४ सप्टेंबर २०२२ । सातारा । जिल्हास्तरीय तपासणी समिती गठीत करावयाची असून या समितीवर बाल हक्क, संगोपन, संरक्षण व कल्याण क्षेत्रात कार्यरत असलेल्या नागरी समुहाचा एक सदस्य तसेच बालकांसोबत काम करण्याचा अनुभव असलेल्या एक मानसोपचारतज्ञ यांची अशासकीय सदस्य म्हणून निवड केली जाणार आहे.
तरी इच्छुक व्यक्तींनी आपली नामांकनासोबत आपण केलेल्या सामाजिक कार्याविषयी माहितीबाबतची कागदपत्रे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, नवीन प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, एस.टी. स्टँन्ड जवळ, सातारा येथे 22 सप्टेंबर 2022 पर्यंत सादर करावेत. अशासकीय सदस्यांचा कालावधी नेमनुकीपासून तीन वर्षाचा राहिल. तसेच या पदावर नियुक्त होणाऱ्या व्यक्तीस कोणत्याही प्रकारचे मानधन अथवा भत्ता अदा केला जाणार नाही, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी व्ही.ए. तावरे यांनी कळविले आहे.