जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुभाष चव्हाण यांच्या कारभाराची चौकशी करा – गोडोलीचे सामाजिक कार्यकर्ते रवी पवार यांचा आंदोलनाचा इशारा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०३ जानेवारी २०२३ । सातारा । क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुभाष चव्हाण यांची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी गोडोलीचे सामाजिक कार्यकर्ते रवी पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले आहे.

निवेदनात नमूद आहे की सातारा जिल्हा रुग्णालयात मनमानी व भ्रष्ट कारभार सुरू आहे त्याचा फटका सर्वसामान्य रुग्णांना बसत आहे डॉक्टर चव्हाण यांच्या हुकूमशाहीमुळे जिल्हा रुग्णालयाचे कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे अनेक कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काचे वेतन दिले जात नाही कर्मचाऱ्यांना वेठीस धरले जात असून या संदर्भातील अनेक तक्रारी आम्हाला प्राप्त झाल्या आहेत त्यामुळे त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी पवार यांनी केली आहे येत्या आठ दिवसात डॉक्टर चव्हाण यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई न झाल्यास आणि जिल्हा रुग्णालयाच्या कारभारात सुसुत्रता न आणल्यास 26 जानेवारी रोजी जिल्हा रुग्णालयासमोर आत्मदहन आंदोलन करण्यात येईल असा इशारा रवी पवार यांनी दिला आहे.


Back to top button
Don`t copy text!