दैनिक स्थैर्य | दि. ५ जुलै २०२३ | सातारा |
सातारा जिल्हा पोलीस दलातील दहा अधिकार्यांना बढती मिळून त्यांच्या जिल्ह्याअंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत.
जिल्हा पोलीस दलातील सातारा नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक कोंडीराम पाटील यांना सातारा मुख्यालयात प्रभारी पोलीस उपअधीक्षकपदी बढती मिळाली आहे. सातारा शहर पोलीस ठाण्यात तात्पुरत्या नेमणुकीवर असलेले पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांना सातारा शहर पोलीस ठाण्यात प्रभारी अधिकारीपदी बढती मिळाली आहे. सातारा जिल्हा विशेष शाखेतील पोलीस निरीक्षक विजय पाटील यांना कराड तालुका पोलीस ठाण्यात प्रभारी अधिकारीपदी बढती मिळाली आहे. सातारा नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांना कराड शहर पोलीस ठाण्यात प्रभारी अधिकारीपदी, नियंत्रण कक्षातीलच पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांना शाहूपुरी पोलीस ठाण्यात प्रभारी अधिकारीपदी, पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांना फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात प्रभारी अधिकारीपदी, पोलीस निरीक्षक संदीप जगताप यांना सायबर पोलीस ठाण्यात प्रभारी अधिकारीपदी बढती मिळाली आहे. तसेच सायबर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक सुनील शेळके यांची फलटण शहर पोलीस ठाण्यात प्रभारी अधिकारीपदी नेमणूक झाली आहे. खंडाळा पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक महेश इंगळे यांची सातारा जिल्हा विशेष शाखेत प्रभारी अधिकारीपदी नेमणूक झाली आहे. तसेच सातारा शहर पोलीस ठाण्यातील महिला पोलीस निरीक्षक वंदना श्रीसुंदर यांची खंडाळा पोलीस ठाण्यात प्रभारी अधिकारीपदी नेमणूक झाली आहे.