‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात युपीएससी परीक्षा उत्तीर्ण रोहन कदम यांची मुलाखत


दैनिक स्थैर्य । दि. ३१ ऑगस्ट २०२२ । मुंबई । माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण रोहन कदम यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल साळुंखे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

गुरुवार, दि. 1 सप्टेंबर 2022 रोजी सायं 7.30 वा. ही मुलाखत महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येईल.

यू ट्यूब – https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महाराष्ट्रातील यशस्वी विद्यार्थ्यांचा टक्का वाढतो आहे.  ग्रामीण भागाची पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या यामध्ये लक्षणीय आहे. जिद्द, आत्मविश्वास, आणि कष्ट करण्याची तयारी असल्यास यश निश्चित मिळते, असा संदेश रोहन कदम यांनी दिला आहे.  त्यांच्या या यशाबद्दल सविस्तर माहिती त्यांनी ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमातून दिली आहे.


Back to top button
Don`t copy text!