दैनिक स्थैर्य । दि. १४ मे २०२२ । मुंबई । माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र ’ या कार्यक्रमात बारामती येथील प्रगतीशील शेतकरी तसेच राज्य कृषी व ग्रामीण पर्यटन समितीचे सदस्य पांडुरंग तावरे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे वरिष्ठ सहायक संचालक देवेंद्र पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.
रविवार, दि. १५ मे २०२२ रोजी सायंकाळी ७.३० वाजता ही मुलाखत महासंचालनालयाच्या पुढील लिंकवर पाहता येईल.
यू ट्यूब – https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR
ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR
16 मे च्या जागतिक कृषी पर्यटन दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य कृषी पर्यटन परिषद 2022 चे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने शेती अर्थव्यवस्थेचे संपूर्ण गणित बदलविण्याची क्षमता असलेले कृषी पर्यटन, त्याची संकल्पना, त्याचा शेतकरी आणि एकूणच ग्रामीण अर्थव्यवस्थेला होत असलेल्या लाभाबाबत श्री. तावरे यांनी जय महाराष्ट्र या कार्यक्रमातून सविस्तर माहिती दिली आहे.