दैनिक स्थैर्य । दि. ०५ सप्टेंबर २०२२ । मुंबई । माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘मतदार यादीतील तपशीलाशी जोडण्याकरिता आणि प्रमाणीकरणासाठी मतदारांकडून ऐच्छिकपणे आधारची माहिती संकलित करणे’ या विषयी मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून तसेच ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवरून मंगळवार दि.६ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. सहायक संचालक श्रीमती संध्या गरवारे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
या मुलाखतीत निवडणूक कायदा व नियमातील बदलामुळे अर्जात झालेले बदल, त्यामुळे मतदार याद्यातील तपशीलाशी जोडण्याकरीता आणि प्रमाणीकरणासाठी मतदारांकडून ऐच्छिकपणे आधारची माहिती कशा प्रकारे संग्रहित करण्यात येत आहे, या कार्यक्रमाचे उद्दिष्ट, ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने माहिती भरणे याबाबत मतदारांना केलेले आवाहन याबाबत सविस्तर माहिती, जिल्हाधिकारी श्रीमती चौधरी यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमात दिली आहे.