दैनिक स्थैर्य । दि. १० ऑक्टोबर २०२२ । सातारा । भारतीय स्वातंत्र्याच्या व छत्रपती शिवाजी कॉलेजच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त छत्रपती शिवाजी कॉलेजचा मराठी विभाग,एन.सी.सी.विभाग,विवेक वाहिनी ,व शिवविजय २०२१-२२ वार्षिक नियतकालिक संपादन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ,१९४२ च्या भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी झालेले लोणंद ता.खंडाळां येथील स्वातंत्र्य सैनिक अण्णा बंडू सापते यांची प्रकट मुलाखत बुधवार दिनांक १२ ऑक्टोबर २०२२ रोजी ब.पी.जी.पाटील सभागृहात आयोजित केली आहे. तसेच त्यांनी भारतीय स्वातंत्र्य संग्रामात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा सत्कार केला जाणार आहे . भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात सातारा जिल्ह्यातील असलेले ते स्वातंत्र्य सैनिक आहेत .या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून अखिल भारतीय स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी
संघटनेचे सरचिटणीस मा.विजय देशपांडे हे उपस्थित राहणार आहेत .तसेच जिल्ह्याचे माहिती अधिकारी मा.दत्तात्रय कोकरे यांची प्रमुख उपस्थिती असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य,व रयत शिक्षण संस्थेचे सचिव मा.प्राचार्य डॉ.विठ्ठल शिवणकर हे आहेत. या सर्वांच्या हस्ते महाविद्यालयाच्या वार्षिक नियतकालिक शिवविजय – २०२१-२२ या अंकाचे प्रकाशन होणार आहे.तरी या समारंभास उपस्थित रहावे असे आवाहन मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.सुभाष वाघमारे व एन.सी.सी.चे लेफटनंट प्रा.केशव पवार यांनी केले आहे.