‘दिलखुलास’ कार्यक्रमात मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे सचिव डॉ.शामकांत देवरे यांची ३१ जानेवारी व १ फेब्रुवारीला मुलाखत

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ३१ जानेवारी २०२३ । मुंबई । माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे, सचिव डॉ.शामकांत देवरे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर मंगळवार दि. ३१ जानेवारी, बुधवार दि. १ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल.

आधुनिक जग हे ज्ञान आणि माहिती यांचे जग म्हणून ओळखले जाते. यामध्ये ज्ञाननिर्मिती, ज्ञानसंवर्धन आणि ज्ञानप्रसार या तिन्ही गोष्टींचा समावेश होतो. याचा विचार करून महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या अंतर्गत मराठी विश्वकोशाचा प्रकल्प हाती घेण्यात आला. मानव्यविद्या आणि विज्ञान व तंत्रज्ञान या दोन ज्ञानशाखांमध्ये जेवढे विषय असतील, त्या सर्वांची माहिती मराठी वाचकांना उपलब्ध करून द्यावी हे विश्वकोशाचे प्रमुख उद्दिष्ट होते. या मंडळाकडून मराठी विश्वकोशाचे आतापर्यंत किती खंड प्रकाशित करण्यात आले आहेत, या मंडळाची कार्यपद्धती व बदलत्या काळानुरूप झालेले बदल अशा विविध विषयांची माहिती महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे, सचिव डॉ.शामकांत देवरे यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून दिली आहे.

वरिष्ठ सहायक संचालक श्रीमती मीनल जोगळेकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.


Back to top button
Don`t copy text!