
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. २२ जून २०२३ | फलटण |
२१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस भारतासह देश-विदेशात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. निरोगी आयुष्यासाठी योग ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. याच अनुषंगाने बुधवार, दि. २१ जून रोजी फलटण येथे भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी ‘मोदी ९’ या अभियानांतर्गत योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
या योग दिनानिमित्त फलटणमध्ये योगगुरू किशोर वाघ यांच्या उपस्थितीत योगाचे धडे उपस्थितांना देण्यात आले. यावेळी माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनीही योग केला. यावेळी खासदार रणजितसिंह यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे फलटणमधील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
