उज्वल भविष्यासाठी विमा काळाची गरज : मालवणकर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, दहिवडी, दि.१०: येथील अक्षर एन्टरप्रायजेसचे प्रोप्रायटर नरेंद्र सटाले यांच्या पुढाकारातून कलर क्लाऊड सोल्युशन प्रा.लि; च्या सहकार्याने फलटणमधील हॉटेल आर्यमानमध्ये डिजीटल कलर झेराक्स मशिन्सचे एकदिवसीय प्रदर्शन दि.6 रोजी संपन्न झाले. यावेळी कलर क्लाऊड सोल्युशन प्रा.लि; पुणे चे कुमार कमल यांची प्रमुख उपस्थिती होती.

फलटण शहर व परिसरातील झेराक्स सेंटर, फोटोग्राफर आणि प्रिंटर्स, डिझाईनर  आदी प्रिटींग क्षेत्रात कार्यरत असणार्‍या व्यावसायिकांसाठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

सदर प्रदर्शनास अकलूज सुपर झेरॉक्सचे रविकिरण फडे, नातेपुते येथील किशोर ढवळे, साखरवाडी येथील मुद्रक व्यावसायिक विशाल दोशी यांच्यासह फलटण, बारामती, माळशिरस, माण आदी तालुक्यातील 70 व्यावसायिकांनी भेट देवून प्रदर्शनाचा लाभ घेतला.

यावेळी प्रदर्शनाच्या आयोजनास सहकार्य केल्याबद्दल कुमार कमल यांचा फलटण येथील ज्येष्ठ व्यावसायिक कांतीलाल गांधी यांच्या हस्ते मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. सर्व उपस्थितांचे स्वागत प्रदर्शनाचे आयोजक नरेंद्र सटाले यांनी केले.

भविष्यकाळ उज्वल व आनंदमय करायचा असेल विमा काळाची गरज असुन प्रत्येकाने विमा उतरवला पाहिजे,विमा योजनामध्ये केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरते असे प्रतिपादन एलआयसी वडूज शाखा प्रबंधक शुभांगी मालवणकर यांनी केले.

बिदाल ता.माण ग्रामपंचायतीस ग्रामस्थांच्या एकत्रित सहकार्याने विकास अधिकारी रणजित माने यांच्या मार्गदर्शाखाली व विमा प्रतिनिधी विजय धुमाळ यांच्या प्रयत्नाने भारतीय आयुर्विमा महामंडळाचा सन २०१८-१९ चा पंचाहत्तर हजार रुपयांचा विमाग्राम पुरस्कार मिळाला असुन धनादेश वितरण प्रसंगी त्या बोलत होत्या.यावेळी उपप्रबंधक भारत गोडसे,विकास अधिकारी रणजित माने,विमा प्रतिनिधी विजय धुमाळ,सरपंच गौरीशितल जगदाळे,  उपसरपंच सविता कुलाळ,शिवाजीराव जगदाळे,प्रताप भोसले,बापुराव जगदाळे उपस्थित होते.
मालवणकर म्हणाल्या कुटुंबातील प्रत्येकाचा विमा असला पाहिजे त्यामाध्यमातुन  बचतीची सवय लागते व कुटुंबास संरक्षण मिळते,
विकास अधिकारी रणजित माने म्हणाले एलआयसी रक्षणच नव्हे तर संरक्षण देते संपुर्ण आयुष्यभर व पश्चात सदैव आपल्या सोबत राहुन जीवन खर्या अर्थाने परिपूर्ण करण्यासाठी भारतीय आयुर्विमा महामंडळ कटिबध्द असल्याचे सांगितले.
यावेळी हिराचंद्र जगदाळे,विष्णू कुलाळ,अजित बोराटे व बिदाल ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते,कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार एच.एन  फडतरे यांनी मानले.

Back to top button
Don`t copy text!