फलटणमध्ये विनाकारण फिरणार्यांची कोरोना चाचणी करून संस्थामक विलीगीकरण करणार : मुख्याधिकारी प्रसाद काटकर


स्थैर्य, फलटण, दि. १८: सध्या फलटण शहरात कोरोनाचे रूग्ण हे मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी ब्रेक द चेन म्हणजेच कडक निर्बंधाबाबत आदेश पारित केलेले आहेत. तरीही फलटण शहरामध्ये विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. विनाकारण बाहेर फिरताना जर कोणी आढळून आला तर त्यांची कोरोना चाचणी करून त्यांना गृह विलीगीकरणाची परवानगी न देता सक्तीने संस्थामक विलीगीकरण करणार असल्याची माहिती फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी दिली.


Back to top button
Don`t copy text!