दैनिक स्थैर्य । दि.०३ मे २०२२ । फलटण । या वर्षीच्या श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पायी वारीच्या पूर्वतयारीकरिता पुणे विभागाचे आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार वारी मार्गाची पाहणी अधिकारी व पालखी सोहळ्याच्या विश्वस्तांकडून पार पडली.
सदर पाहणीवेळी संत ज्ञानेश्वर पालखी सोहळा विश्वस्त अभय महाराज टिळक, बाळासाहेब आरफळकर मालक, मारुती कोकाटे, ज्ञानेश्वर वीर व्यवस्थापक आणि बाळासाहेब चोपदार हे उपस्थित होते. तर प्रशासनातील प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे, तहसीलदार समीर यादव, गट विकास अधिकारी डॉ. सौ. अमिता गावडे – पवार, नॅशनल हायवेचे अधिकारी व कंत्राटदार यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
सदरील पाहणीवेळी स्वच्छता, पाणीपुरवठा आणि पालखी महामार्गाच्या प्रगतीपथावरील कामाच्या अनुषंगाने सुरक्षा या प्रमुख मुद्द्यांच्या अनुषंगाने सूचना देण्यात आल्या.
पालखी मार्गावरील चांदोबाचा लिंब, तरडगाव पालखीतळ, सुरवडी, फलटण, विडणी, पिंपरद, बरड पालखीतळ, साधु बुवाचा ओढा या ठिकाणांची व महामार्गाची पाहणी करण्यात आली, अशी माहिती फलटण उपविभागाचे उपविभागीय अधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी दिली.