सैनिक स्कुलच्या परीक्षेत यश मिळविल्याबद्दल चैतन्यकुमार निकम याचा सत्कार करतांना शिक्षक समितीचे सर्व पदाधिकारी
स्थैर्य, पिंपोडे बुद्रुक, दि. १४ : नुकतेच दहावी आणि बारावी परीक्षेचे निकाल लागले. या निकालात कोरेगाव तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांचे पाल्य यांनी घवघवीत यश संपादन केले. त्याबद्दल त्यांचा घरी जाऊन पेढे देऊन नुकताच कोरेगाव तालुका शिक्षक समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. हा नाविन्यपूर्ण उपक्रम विद्यार्थ्याना प्रोत्साहन देणारा व संघटनेला नवी दिशा देणारा असल्याचे गौरवोद्गार शिक्षक बँकेचे संचालक किरण यादव यांनी व्यक्त केले.
यावेळी तालुक्यातील दहावी ,बारावी, नवोदय ,सैनिक स्कूल इत्यादी स्पर्धा परीक्षांमध्ये चमकदार कामगिरी केलेल्या प्राथमिक शिक्षकांचा व त्यांच्या पाल्यांचा बुके देऊन सन्मान करण्यात आला.कोरेगाव तालुका हा दक्षिण उत्तर असा सुमारे ६५ किलोमीटर लांबीचा आहे. यामध्ये सोळशी पासून पवारवाडी पर्यंत अनेक प्राथमिक शिक्षक प्राथमिक शाळा मध्ये ज्ञानदानाचे काम करीत आहेत. समाजातील मुलांना घडविताना आपल्याही मुलाला ते घडवीत असतात. वर्गातील मुलां च्या यशाबद्दल शिक्षकांना नेहमीच अभिमान वाटतो. आपल्या वर्गातील मुलांची प्रगती पाहून शिक्षकांचे ऊर भरून येते. याचप्रमाणे आपल्या स्वतःच्या पाल्याचे प्रगती बाबत कोरेगाव तालुका शिक्षक समिती परिवाराने घरी जाऊन पाल्याचे व कुटुंबीयांचे अभिनंदन केले. ही गोष्ट आमच्यासाठी खूप प्रेरणादायी आहे असे अनेकांनी यावेळी सांगितले.तसेच पालकांनी समाधान व्यक्त केले.कोरेगाव तालुका शिक्षक समिती ही संघटनेच्या वेगवेगळ्या उपक्रमातून नेहमीच दिशादर्शक काम करत असते. वेगवेगळे समाज उपयोगी उपक्रम राबवत असते,विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा देणारे उपक्रम राबवित असते. यामध्ये प्राथमिक शिक्षक बँकेमार्फत देण्यात येणारी वैद्यकीय मदत सभासदाला घरी जाऊन देणे, covid-19 च्या काळामध्ये उपेक्षित समाजातील कुटुंबांना अन्य धान्य वाटप करणे, बालसुधारगृहातील बालकांना व मतिमंद शाळेतील मुलांना फळे व शालोपयोगी साहित्य वाटप करणे, इत्यादी संघटनात्मक उपक्रम नेहमीच कोरगाव तालुका शिक्षक समिती राबवीत असते.कोरेगाव तालुका शिक्षक समितीच्या वतीने अध्यक्ष नितीन शिर्के, सरचिटणीस नेताजी जगताप, उपाध्यक्ष उदय घोरपडे, कार्याध्यक्ष सुरेश पवार, कोषाध्यक्ष सतीश ढमाळ, सरचिटणीस प्रकाश पोळ, प्रसिद्धीप्रमुख अकबर मुलाणी, महिला आघाडीच्या अध्यक्षा मुस्कान आतार, सरचिटणीस विद्या खराडे,उर्मिला शिर्के,समितीचे क्रियाशील सदस्य संतोष मांढरे, जहांगीर हकीम, अविनाश खाडगे, प्रशांत निकम, रणजीत निकम, बाबामिया आतार, देवेंद्र डांगोरे संजय गंगावणे, विजय शिंदे, अमीर आतार, संतोष घाडगे, संतोष यादव असे अनेक शिक्षक समितीचे सभासद यावेळी उपस्थित होते.