दैनिक स्थैर्य । दि. २५ मार्च २०२२ । बारामती । गड किल्ले संवर्धन करणे व त्यांची निगा राखणे व विद्यार्थी दशेत प्रत्येक किल्ल्याचा इतिहास माहीत होणे साठी न्यू युवा शिवक्रांती प्रतिष्ठान पुढाकार घेणार असल्याची माहिती अध्यक्ष हेमंत नवसारे यांनी दिली.
न्यू युवा शिवक्रांती प्रतिष्ठान च्या वतीने शिवजयंती निमित्त (सोमवार 21 मार्च ) कोरोना योध्याचा सन्मान,गड,किल्ले यांचे संवर्धन करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणे आणि गड किल्ल्यावर प्लास्टिक कचरा व धूम्रपान करू नका म्हणून प्रबोधन करणाऱ्या संघटनांचा सन्मान,लॉक डाऊन च्या काळात शिवजयंती निमित्त ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा चे आयोजन केले होते त्यामधील विजेत्यांचा सन्मान व मिरवणुकीत सहभागी झालेल्या गोंधळी,पोतराज,चित्त थरारक कसरती करणारे कलाकार,बँड पथक,आदी सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी न्यू युवा शिवक्रांती प्रतिष्ठान चे अध्यक्ष हेमंत नवसारे ,उत्सव प्रमुख सुनील शिंदे,नगरसेवक जयसिंग देशमुख,बारामती बँक चे अध्यक्ष सचिन सातव,यशश्री फौंडेशन च्या अध्यक्षा सुप्रिया बर्गे व इतर मान्यवर उपस्तीत होते. या प्रसंगी बारामती नगरपरिषद, सिल्व्हर ज्यूबली व रुई रुग्णालय येथील कर्मचारी यांना कोरोना योद्धा म्हणून मान्यवर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले तर दुर्ग भ्रमंती सोशल फाउंडेशन,किल्ले देश ही पहचान फाउंडेशन व वक्तृत्व स्पर्धे मधील विजेते मयूर नींबाळकर ,श्रावणी गायकवाड,आर्या भोसले आदी ना सन्मानित करण्यात आले.
शिवजयंती निमित्त मिरवणूक व इतर बाबीवर खर्च न करता शासनाच्या मदती ची अपेक्षा न ठेवता लोक वर्गणी व प्रतिष्ठान च्या माध्यमातून गड,किल्ले यांची निगा व संवर्धन व वनीकरण करण्यासाठी प्रयत्नशील राहू असे प्रतिष्ठान चे अध्यक्ष हेमंत नवसारे यांनी सांगितले आभार सचिन भंडारे यांनी मानले.