दैनिक स्थैर्य | दि. २८ सप्टेंबर २०२३ | फलटण |
फलटण तालुक्यातील दुधेबावी येथे फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मान्यताप्राप्त, कृषी महाविद्यालय फलटण येथील कृषीदूतांनी ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव औद्योगिक जोड प्रकल्प २०२३-२४ कार्यक्रमांतर्गत ठिबक सिंचन तसेच त्याचे भाग कार्यपद्धत व फायदे याविषयी सविस्तर माहिती दिली.
हे प्रात्यक्षिक प्रगतशील शेतकरी विनायक गाडेकर यांच्या शेतावर घेण्यात आले. यावेळी गावातील शेतकर्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद नोंदवला.
कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण, कार्यक्रम समन्वयक प्रा. नीलिमा धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्निल लाळगे व प्रा. नीतीशा पंडित तसेच विषय विशेषज्ञ प्रा. डॉ. धायगुडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीदूत दराडे, राजवर्धन भोसले, यश तावरे, संकेत शिंदे, रोहित फाळके, दिग्विजय मेनकुदळे, शिवम यांनी उत्कृष्ट अशा पद्धतीने ठिबक सिंचनाविषयी माहिती दिली.