धुळदेव येथे कृषिकन्यांनी दिली ठिबक सिंचनावर माहिती


दैनिक स्थैर्य | दि. २९ जानेवारी २०२४ | फलटण |
फलटण तालुक्यातील धुळदेव येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न, फलटण एज्युकेशन सोसायटी अंतर्गत कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषिकन्यांनी ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२३-२०२४ कार्यक्रमाअंतर्गत ठिबक सिंचन माहिती प्रात्यक्षिक हा कार्यक्रम उत्कृष्टरित्या पार पडला.

कृषीकन्या सिद्धी शेटे, साक्षी जाधव, समृद्धी जगताप, सिद्धिका कांबळे, स्वेजल पाटील, प्रियांका शिंदे, प्रियांका भोसले व श्वेता सस्ते यांनी ठिबक सिंचन मॉडेल, ठिबक सिंचन विषयी तक्ते इत्यादींचा वापर करून शेतकर्‍यांना या पद्धतीविषयी सविस्तर माहिती दिली. हे प्रात्यक्षिक श्री. कोल्हे यांच्या शेतात घेण्यात आले. तसेच कृषिकन्यांनी ही ठिबक सिंचन पद्धत वास्तविकपणे कशाप्रकारे शेतात वापरावी, याची माहिती दिली. कृषिकन्यांनी ठिबक सिंचन मॉडेलचे विविध भाग जसे की पी.व्ही.सी. सबमेन लाईन, मेनलाईन, इमिटर, स्क्रीन फिल्टर, पंप, प्रेशर गेज इत्यादींचे कार्य व माहिती सविस्तरपणे शेतकर्‍यांना दिली. तसेच कृषीकन्यांनी ठिबक सिंचन पद्धतीचे विविध फायदे, जसे की पिकांना गरजेनुसार पाणी वापर, शेतीला पाणी देण्याच्या दुसर्‍या पद्धतीपेक्षा ३० ते ७०% पाणी बचत, २० ते २००% पर्यंत उत्पादन वाढ, पिकांची जोमाने, एकसारखी व जलद होणारी वाढ इत्यादी शेतकर्‍यांना पटवून दिले. या प्रात्यक्षिकास शेतकर्‍यांनी उपस्थित राहून उत्तम प्रतिसाद दिला.

कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण सर, उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर सर, कार्यक्रम समन्वय प्रा. नीलीमा धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्नील लाळगे सर, प्रा. नितिशा पंडित, प्रा. डॉ. गोपीचंद धायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.


Back to top button
Don`t copy text!