दैनिक स्थैर्य | दि. ११ ऑगस्ट २०२४ | फलटण |
खटाव तालुक्यातील ललगुण येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न, फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित, कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषीदूतांनी ग्रामीण जागरुकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२४-२५ कार्यक्रमांतर्गत कृषीदूतांनी शेतकर्यांना शेतमाल खरेदी-विक्रीबद्दलच्या आधुनिक तंत्रज्ञानची ओळख करून दिली.
शेतकर्यांना पिकवलेला शेतीमाल विक्री करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. तसेच विक्रीची कला आणि वेळ नसल्याने दर्जेदार शेतीमाल असतानाही शेतकर्यांना अपेक्षित फायदा होत नाही. ही समस्या दूर करण्यासाठी शेतमाल विक्रीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची गरज भासते. त्यासाठी अॅप्स उपलब्ध आहेत. शेतमाल विक्री अॅपद्वारे शेतकरी आपला शेतमाल मोबाईलद्वारेच विक्री करू शकतात. विविध बाजारपेठांच्या बाजारभावाची माहिती, हवामान अंदाज, बियाणे याबद्दल सहजरित्या माहिती मिळवू शकतात. कृषीदूतांनी शेतकर्यांना याबद्दल मार्गदर्शन केले. यासंबंधित अॅप्सचे महत्त्व सांगितले.
ग्रामोफोन, फार्मराइझ,भारत अॅग्री, जैविक कृषी व कृषी नेटवर्क हे अॅप्स डाऊनलोड करून ते कसे वापरतात याचे प्रात्यक्षिक दाखवले. यावेळी शेतकरी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
यासाठी कृषी महाविद्यालय फलटणचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण सर, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय फलटणचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर सर, समन्वयक प्रा. निलिमा धालपे मॅडम, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्निल लाळगे सर, प्रा. नितिशा पंडित मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीदूत उदयसिंह गायकवाड, सुमित बागुल, ओंकार खेडकर, गौरव रायकर, अमितेश बोदडे, आदित्य घेवारे यांनी हे प्रात्यक्षिक पार पाडले.