दैनिक स्थैर्य | दि. २४ जून २०२४ | फलटण |
खटाव तालुक्यातील डिस्कळ येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी सलग्न व फलटण एज्युकेशन सोसायटी अंतर्गत कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषिदूतांनी ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत पिकांवरील वाढत्या रोगांचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी तसेच पिकांना लवकरात लवकर परिपक्वता येण्यासाठी विविध प्रकारची बीजप्रक्रिया कृषिदूतांमार्फत करून दाखविण्यात आली.
यावेळी खरिप ज्वारी या पिकावरील बुरशीजन्य रोग नियंत्रण करण्यासाठी गंधक (सल्फर ९० ॠ) हे वापरण्यात आले. गंधक हे ब्रॉड स्पेक्ट्रम बुरशीनाशक आहे आणि त्यात प्रतिबंधात्मक, उपचारात्मक आणि स्पर्शिनाशक बुरशीनाशक गुणधर्माचे अद्वितीय संयोजन आहे. ग्रेन स्मट, लूज स्मट, स्पोरिस्पोरियम या रोगांसाठी योग्य उपाय आहे. तसेच बीज प्रक्रियेचे विविध फायदे शेतकर्यांना पटवून देण्यात आले. या प्रकियेविषयी माहिती शेतकर्यांना देण्यात आली. या कार्यक्रमासाठी अनेक शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.
कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण सर व श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. सी. निंबाळकर सर, कार्यक्रम समन्वयक प्रा. निलिमा धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्नील लाळगे सर, कार्यक्रम अधिकारी नीतिषा पंडित, पीक रोगतज्ञ प्रा. पी. व्ही. भोसले सर यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी दूत यश हेमचंद मेश्राम, अथर्व बाळू शिंदे, रोहित रामदास लहामटे, तेजस शरद शेळके, विशाल बाळासाहेब आभाळे, हर्षल संजय वाकडकर, ओंकार प्रताप शिंदे, पुष्पराज राहुल मोकाशी यांनी हा उपक्रम पार पाडला.