दैनिक स्थैर्य | दि. १७ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
फलटण तालुक्यातील सोनवडी (खुर्द) येथे फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मान्यताप्राप्त, कृषी महाविद्यालय फलटण येथील कृषीदूतांनी ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव औद्योगिक जोड प्रकल्प २०२३-२४ कार्यक्रमांतर्गत ठिबक सिंचन तसेच त्याचे भाग कार्यपद्धत व फायदे याविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी गावातील शेतकर्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद नोंदवला.
कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण, कार्यक्रम समन्वयक प्रा. नीलिमा धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्निल लाळगे व प्रा. नीतीशा पंडित तसेच विषय विशेषज्ञ प्रा. डॉ. धायगुडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीदूत केदार घनवट, भूषण गायकवाड, शुभम कोकणे, अंगद कागणे, शुभम आडके, दुर्वेश बोराटे, गणेश कोळेकर या कृषीदूतांनी हा कार्यक्रम पार पाडला.