
दैनिक स्थैर्य | दि. ९ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित, कृषी महाविद्यालय फलटणच्या सातव्या सत्रातील विद्यार्थ्यांनी ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव औद्योगिक जोड प्रकल्प २०२३-२४ कार्यक्रमांतर्गत पिकावरील वाढत्या रोगाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी बोर्डोक्स मिक्श्चरचे प्रात्यक्षिक कृषी दूतांमार्फत करून दाखवण्यात आले. यावेळी गावातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण, कार्यक्रम समन्वयक प्रा. निलीमा धालपे, कार्यक्रमाधिकारी प्रा. स्वप्निल लाळगे व प्रा. नितिशा पंडित, प्रा. पी. व्ही. भोसले, यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिदूत केदार घनवट, भूषण गायकवाड, शुभम कोकणे, अंगद कागणे, शुभम आडके, दुर्वेश बोराटे, गणेश कोळेकर या कृषीदूतांनी हा कार्यक्रम पार पाडला.