राज्याला दिशा देणारे औद्योगिक कार्य कौतुकास्पद : माजी मंत्री राजेंद्र मुळक; हरणाई सहकारी सुतगिरणी सदिच्छा भेट

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

हरणाई सहकारी सुतगिरणी ची पाहणी करताना माजी मंत्री राजेंद्र मुळक यांच्यासोबत रणजितसिंह देशमुख व राहूल चव्हाण व इतर

स्थैर्य, खटाव, दि.१३:कोणताही राजकीय वारसा नसताना या भागात रणजितसिंह देशमुख यांनी स्वत:च्या आत्मविश्वासावर हे प्रकल्प उभारून राज्याला दिशा देणारे औद्योगिक कार्य निश्चीतच कौतुकास्पद असल्याचे मत राज्याचे माजी अर्थ व पणन राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांनी व्यक्त केले.

येळीव ता.खटाव येथील हरणाई सहकारी सुतगिरणी सदिच्छा भेटीप्रसंगी ते बोलत होते.यावेळी हरणाई उद्योग समुहाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख,राहूल चव्हाण, सुनिल चव्हाण, संचालक रणधीर जाधव, मोहनभाऊ देशमुख, गजानन शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

माजी मंत्री राजेंद्र मुळक पुढे म्हणाले की, रणजितसिंह मला भावासारखे असून त्यांची कार्यपद्धती व धडपड खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. त्यांचे या भागाबद्दल ची ओढ व समाजकारण आपण जवळून पाहिले आहे. त्यांची औद्योगिक विचारसरणी व राजकीय दबदबा या खटाव-माण तालुक्याला नवी दिशा व उर्जा प्राप्त करून देईल यात तिळमात्र शंका नाही. या भागात नवनवे प्रकल्प उभारून येथील शेतकरी व बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी त्यांची सतत धडपड सुरू असते. अश्या नेतृत्वाला लवकरच संधी प्राप्त होईल व या भागाचा उर्वरीत विकास होईल असा विश्वास ही यावेळी त्यांनी व्यक्त केला.

प्रास्ताविकात हरणाई उद्योग समुहाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी हरणाई सहकारी सुतगिरणी व माणदेशी प्रबोधनकार मागासवर्गीय सहकारी सुतगिरणी ची प्रगतीबद्दल बोलून साखर कारखान्याविषयी विस्तृतपणे माहिती दिली.तर सुतगिरणी उभारताना माजी मंत्री राजेंद्र मुळक यांनी केलेल्या मदतीची उदाहरणासहीत आठवण करून दिली.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जनरल मॅनेजर रमेश भोसले यांनी केले.तर आभार राजकुमार चौगुले यांनी मानले.यावेळी निलेश घार्गे, अमृत मटकल्ली,अजय गुरसाळे सयाजी सुर्वे आदींची उपस्थिती होती.

हरणाई सहकारी सुतगिरणी सदिच्छा भेटीप्रसंगी माजी मंत्री राजेंद्र मुळक यांचा सत्कार करताना हरणाई उद्योग समुहाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख ,यावेळी उपस्थित राहूल चव्हाण व इतर

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!