• Contact us
  • Home
  • Privacy Policy
स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे योजना

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
मार्च 29, 2023
in लेख

आपल्या जिल्ह्याची  शेती ही पूर्णपणे पावसावर अवलंबून असल्याने शेती उत्पादनात मोठ्या प्रमाणावर चढ-उतार येतात. त्यामुळे शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न मिळत नाही. त्यासाठी हमखास सिंचन सुविधा शेतकऱ्यांकडे असावी  लागते. त्यामुळे कृषी विभागामार्फत मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे ही योजना राबविण्यात येत आहे.

या शेततळ्यातील पाण्याचा वापर करुन फळबाग, फुलशेती, भाजीपाला यासारखी पिके घेऊन हमखास उत्पन्न मिळवणे शेतकऱ्यांना सहज शक्य होते.

लाभार्थी पात्रता निकष :

अर्जदार शेतकऱ्याकडे स्वत:च्या नावावर किमान 0.60 हेक्टर क्षेत्र आवश्यक आहे. शेतकऱ्याची जमीन शेततळे खोदण्यास तांत्रिकदृष्ट्या योग्य असावी. अर्जदाराने यापूर्वी शासकीय योजनेतून शेततळे या घटकाचा लाभ घेतलेला नसावा.

आवश्यक कागदपत्रे :

जमीनीचा सात-बारा आणि 8-अ उतारा, आधारकार्ड झेरॉक्स, बँक पासबुक झेरॉक्स, हमीपत्र आणि जातीचा दाखला आदी कागदपत्रे आवश्यक आहेत.

लाभार्थी निवड :

शेतकऱ्यांनी http://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळ CSC केंद्रावरुन ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा. ऑनलाईन अर्ज करतेवेळी महाडीबीटी प्रणालीवर with inlet-outlet/without inlet-outlet यापैकी एका बाबीची निवड करावी. महाडीबीटी ऑनलाईन पोर्टलवर प्राप्त अर्जातून संगणकीय प्रणालीद्वारे सोडतीने निवड होईल.

आकारमान व अनुदान :

अ.क्र. आकारमान (मी.) इनलेट/आऊटलेट खोदाई व सिल्ट ट्रॅपसह शेततळे अनुदान रक्कम (रु.) इनलेट/आऊटलेट खोदाई व सिल्ट ट्रॅप विरहीत शेततळे अनुदान रक्कम (रु.)
बाजु उतार 1:1 बाजु उतार 1:1
1 15X15X3 23,881 18,621
2 20X15X3 32,034 26,774
3 20X20X3 43,678 38,417
4 25X20X3 55,321 50,061
5 25X25X3 70,455 65,194
6 30X25X3 75,000 75,000
7 30X30X3 75,000 75,000
8 34X34X3 75,000 75,000

 

विशेष सूचना :

शेततळ्याचे खोदकाम झाल्यानंतर प्लास्टीक अस्तरीकरण करण्यासाठी http://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर शेतकऱ्यांनी स्वतंत्र ऑनलाईन अर्ज करावा. प्लास्टीक अस्तरीकरण किंमतीच्या 50 टक्के अथवा 75 हजार रुपये याप्रमाणे अनुदान उपलब्ध आहे. आधार क्रमांक प्रमाणीकरण आवश्यक आहे. तसेच भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड, एकात्मिक फलोत्पादन अभियान (MIDH) व मग्रारोहयो या योजनांमधून फळबाग व इतर अनुषंगिक बाबीसाठी (कांदाचाळ, शेडनेट, पॉलीहाऊस, प्लास्टीक मल्चिंग, यांत्रिकीकरण, प्रक्रिया उद्योग आदी) अनुदान उपलब्ध आहे.

लाभार्थ्यांची जबाबदारी :

कृषी विभागाचे कृषी सहाय्यक यांनी निश्चित केलेल्या ठिकाणी शेततळे घेणे बंधनकारक राहील. कार्यारंभ आदेश किंवा पूर्वसंमती पत्र मिळाल्यापासून शेततळ्याचे काम तीन महिन्यात पूर्ण करणे बंधनकारक राहील. अधिक माहितीकरिता कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करावा.

जिल्हा माहिती कार्यालय,उस्मानाबाद


Previous Post

शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका अप्रत्यक्षपणे मान्य केली – शिंदे गटाकडून दावा

Next Post

छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्काराचे वितरण

Next Post

छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्काराचे वितरण

ताज्या बातम्या

सातारच्या इतिहासाला सोन्याचा मुलामा देणार

मे 29, 2023

राजधानी मोहिमेच्या स्वागताला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री येणार

मे 29, 2023

फसवणूक झालेल्या ऊस वाहतूकदार, कंत्राटदारांसाठी कोळकी येथील रेस्ट हाऊसमध्ये बैठकीचे आयोजन

मे 29, 2023

छत्रपती शिवरायांचे कार्य प्रेरणादायी – राज्यपाल रमेश बैस

मे 29, 2023

पशुसंवर्धन विभागात ४४६ पदांची भरती केली जाणार – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती

मे 29, 2023

कामगारांची पारदर्शकतेने नोंदणी करून शासकीय योजनांचा गतीने लाभ द्यावा – मंत्री डॉ. सुरेश खाडे

मे 29, 2023

यूपीएससी परीक्षेत राज्यात प्रथम आलेल्या डॉ. कश्मिरा संखे यांची दिलखुलास कार्यक्रमात ३० मे रोजी मुलाखत

मे 29, 2023

सहकार मंत्र्यांच्या कार्यालयातून एक फोन अन्…शेतकऱ्याच्या खात्यात ५० हजारांचे अनुदान जमा

मे 29, 2023

मनरेगाचा आधार; मजुरांना नियमित रोजगार

मे 29, 2023

संस्मरणीय ठरेल अशा शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करणार – सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार

मे 29, 2023
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!